
सहसंपादक -रामभाऊ भोयर
राळेगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये रमजान ईद च्या पार्शवभूमीवर मुस्लिम बांधवांसाठी दिं १९ एप्रिल २०२३ रोज बुधवारला सायंकाळी ७:०० वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख जामा मस्जिद चे मोहम्मद इमाम अफरोज आलम तसेच अब्दुल हक मज्जिदचे इमाम मौलाना अझहर यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन प्रांगणात मुस्लिम बांधवांनी उपवास सोडत इफ्तार पार्टीत सहभाग घेतला.
यावेळी शहरातील विविध समाजाचे प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. या प्रसंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौबे यांनी रमजान महिन्याच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी केले यावेळी इफ्तार पार्टीला शहरातील बबलू सय्यद इम्रान पठाण अफसर सय्यद बादशाह काझी पैकू शेठ रफिक शेख तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील,गायकवाड, पोलीस, पत्रकार संघटनेचे सचिव राष्ट्रपाल भोंगाडे, महेश भोयर,पोलीस नितीन गेडाम, इरपाते, गोपनीय (खुपिया) रुपेश जाधव बरेच मुस्लिम बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.
