
तालुका प्रतिनिधी(ग्रामीण) : विलास राठोड
निंगनूर अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी या गावामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागेशवाडी येथे वर्ग 1ते 5 आहेत परंतु शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकच शिक्षक आहेत .एकटा शिक्षक पाच वर्ग सांभाळण्यात असक्षम असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आणखी एका वाढीव शिक्षकाची मागणी ग्रामस्थ करीत आहे .मुलांना शिकविण्याकरिता एकच शिक्षक असल्याने मुलांचे भवितव्य धोक्यात आहे .
नागेशवाडी गावातील लोक ग्राम सभा घेऊन उमरखेड येथे पंचायत समितीला वारंवार तक्रार देऊनही आज पर्यंत बिडीओ साहेबांनी गावकऱ्यांच्या या मागणी कडे दुर्लक्ष केले आहे. मागील 2 ते 3 वर्षापासून एकच शिक्षक येथे कार्यरत आहे.
तरी बिडीओ साहेबांनी नागेशवाडी येथील पाहणी करून एक वधूव शिक्षक देण्यात यावा अशी नागेशवाडी लोकांची व शाळा समिती अध्यक्ष विलास नामदेव जाधव व प्रकाश गोंड सर व शिक्षण तज्ञ विलास तुलसीराम राठोड यांनी शाळेंत सभा घेत मागणी केली आहे.
