

माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर बंदीभागात नक्षलग्रस्त परिसर म्हणुन कुप्रसिद्ध असलेल्या भागात दराटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत कधी नव्हे तेवढे अवैध व्यवसाय सध्या जोमात सुरू झाले आहे.
एकीकडे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड साहेब प्रत्येक क्राइम मिटिंगमध्ये वारम वार प्रत्येक ठाणेदाराला सुचना देत आहेत की, आप आपल्या कार्यक्षेत्रातील अवैध व्यवसायावर आळा घाला अशी तंबी देत असतांनाही दराटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसायाने जोर धरल्याने येथील ठाणेदारावर असा कोणत्या गाॅड फादर चा आशीर्वाद आहे की ते चक्क जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबांच्या आदेशालाही खुंटिला टांगुन एक कलमी वसुलीचा कार्यक्रम राबवत आहेत, यामुळे जनते मध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दराटी पोलिस स्टेशनला भवानी आणि दराटी या दोन बिट असुन यामध्ये २२ गावांचा समावेश आहे.यामधील बोरगाव ला २ गावठी दारुचे अड्डे, डोंगरगाव ला १ गावठी दारूचा अड्डा, घमापुर ला ३ दारुचे अड्डे, १ मटक्याचा अड्डा, खरबी ला १ दारु अड्डा, १ मटका अड्डा, १ जुगार अड्डा, दराटी ला १ मोठा जुगार अड्डा, ३ दारुचे अड्डे आणि मोबाईल वर मटक्याचे आकडे घेतली जातात, कोरटा ला १ दारु अड्डा, गाडीबोरी ला १ जुगार अड्डा, २ दारुचे अड्डे आणि भवानीला १ जुगार अड्डा, ३ दारु अड्डे, २ मटक्याचे अड्डे आहेत. वरिल प्रत्येक गावात हे अशे अवैध व्यवसाय बोकाळल्याने दारु ढोसुन तळीराम घरी महिलांशी भांडण तंटे करण्याचे प्रमाण कमालीचे वाढल्याने महिलांन वर शारिरीक व मानसिक अत्याचार वाढला आहे. तसेच मटका आणि जुगार खुलेआम चालु असल्याने अल्पवयीन मुलेही यामध्ये व्यसनाधीन होतांना दिसत आहेत. बरेच वेळा गावठी दारु बंद करण्यासाठी महिला मंडळीनी पोलिसांना तोंडी मागणी केल्याची बोलल्या जात आहे. तरी यामध्ये ठाणेदार दराटी यांनी ठोस असे काही न केल्याने आता बंदी भागातील महिला थेट जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांच्या कडेच आपली कैफियत मांडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दराटी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेले अवैध व्यवसाय रोखण्यासाठी आता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड साहेबांनीच पाऊल उचलावे अशी मागणी बंदी भागातील नागरिक करीत आहेत.
___
अवैध व्यवसायीकांच्या विरोधात प्रशासन कारवाई करत आहे. अशा प्रकारचे व्यवसाय जर दराटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत चालत असतील तर निश्चितच योग्य ती कारवाई करू
▪️ प्रदीप पाडवी.
उपविभागीय पोलिस अधिकारी, उमरखेड
