

जिल्हा प्रतिनिधी ::प्रवीण जोशी
यवतमाळ.
लाखो आणि हजारो घरा घरात विद्युत पोहोचवणारे हात म्हणजेच लाईनमन होय महावितरणचे कर्मचारी वर्षातील तीन ऋतू मध्ये सुद्धा त्यांची नौकरी व्यस्त असते अनेक अडचणींना सामोरे ठाकत विद्युत ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत कसा राहील हेच एक मात्र ध्येय त्यांच्यासमोर असते कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत विद्युत येण्यास थोडासा जरी उशीर झाला तरी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये अनेक जण फोन लाऊन लाईन कधी येणार याची विचारणा होते पण ज्यावेळेस जिथे लाईन नादुरुस्त झाली आहे तो दुरुस्तीचा खांब शोधण्यासाठी तीन ते चार किलोमीटर फिरावे लागते त्यावेळेस तो फॉल्ट सापडतो अशा अडचनीत सुद्धा ग्राहकांनी समजून घ्यायला हव्या सगळे काही कौटुंबिक अडचणीला बाजूला सारून ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत कसा होईल हे प्राधान्याने बघणाऱ्या लाईनमन बद्दल आजचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “लाईनमन दिवस” साजरा करण्यात आला. राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग ढाणकी यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून पी . व्ही वाघमारे व ए.बी. चव्हाण सहाय्यक अभियंता ढाणकी, एस. डब्ल्यू. गेडाम कनिष्ठ अभियंता साखरा, आर .आर .रामटेके कनिष्ठ अभियंता दराटी, सहाय्यक लेखापाल आर. जे .येडतकर, निवृत्त लाईनमन सी.पी .बाभळे उपस्थित होते.
कोणत्याही प्रकारचे भौतिक सुख उपभोगायचे असल्यास विद्युत शिवाय पर्याय नाही . गिरणीतील दळण दळण्यापासून ते बोरवेल मधून पाणी बाहेर खेचण्यासाठी विद्युतची नितांत गरज असते. तर शेती ओलीत करावयाचे असल्यास विद्युत प्रवाह शिवाय पर्याय नसतो या सर्वामागे असते ती असंख्य कामगारांची व तंत्रज्ञांची भल्ली मोठी राबत असलेली यंत्रणा व या सर्व महाकाय बाबीवर नियंत्रण ठेवणारे व २४ तास अविरत वीजपुरवठा करण्यासाठी अहोरात्र वेगाने काम करणारी कामगार यंत्रणा विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी. हाच कर्मचारी सर्वांच्या घरात,कार्यालयात लख प्रकाश कसा राहील हाच त्यांचा उद्देश आणि आज त्यांच्या प्रती त्यांनी दिलेला सेवाभावाची आठवण म्हणून लाईनमन दिवस ढाणकी येथे आयोजित करून यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी प्रधान यंत्रचालक प्रभाकर दिघेवार हे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून सर्व परिचित आहेत. त्यांच्या व्यंगचित्राच छोटीस प्रदर्शन ही लावण्यात आल होत. लाईनमन अनिल सोळंके, गजानन राचटकर, दत्ता कदम, दीपक जवणे, शेख ईरफान यांनी लाईनमन बद्दल अनुभव बोलून दाखवले केले. तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी लाईनमन दिवसाचे महत्त्व याविषयी विस्तृत माहिती देऊन सर्व लाईनमन यांचा गौरव केला.
कार्यक्रमास ढाणकी, बिटरगाव, दराटी व साखरा सेंटर मधील सर्व नियमित व बाह्य स्त्रोत लाईनमन उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर दिघेवार प्रधान यंत्रचालक यांनी केले व उपस्थित लाईनमन यांना “विद्युत सुरक्षा” प्रतिज्ञा दिली. तर ए. एन. सय्यद कनिष्ठ लिपिक यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यालयीन कर्मचारु व सुरक्षा रक्षक यांनी सहकार्य केले.
