
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
लोकशाहीतील महत्त्वाचा घटक म्हणून पत्रकार बांधवांना मानल्या जाते, सर्वात मोठ्या बलाढ्य असलेल्या लोकशाही प्रधान देशात चौथा महत्त्वाचा स्तंभ मानला जातो व समाजातील सर्व चांगल्या वाईट घडामोडी घडत असताना त्यावर नजर ठेवून त्या प्रकाशित करणे हा पत्रकार बांधवांचा धर्मच होय पण याच महत्त्वाच्या घटकावर आणि स्तंभावर जीवघेणे हल्ले होऊन काही उपटसुंभ लोकामुळे पत्रकार बांधव असुरक्षिततेच्या भावनेत वावरताना दिसत आहे ढाणकी पासून जवळच असलेल्या निंगणुर गावचे मैनोदीन सौदागर एका दैनिकाचे काम करतात व गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरत असताना त्यांनी गावच्या अनेक अडचणींना वाचा फोडली व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम आपल्या पत्रकारितेतून केले असे असताना विरोधात वृत्त प्रकाशित केले म्हणून त्या व्यक्तीने मारहाण करण्या पर्यंत मजल गेली त्यामुळे हल्लेखोरांचे धाडस वाढले आहे.
कोकणातील रिफायनरी बाबत वृत्त प्रकाशित केले म्हणून तेथील एका समर्थकाने संबंधित पत्रकारास गाडी अंगावर घालून जीवनाशी ठार मारले व आपला हेतू साध्य केला आणि पत्रकारावर कोणीही हल्ला करू शकते व सत्तेपुढे आणि दादा लोकांच्या वरदहस्तापुढे शहाणपण चालत नसते असे म्हणायचे का?? वाळू तस्कर अवैध व्यवसाय गैर अनाधिकृत कामे यांच्या विरोधात बातम्या प्रकाशित केल्यानंतर अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर हे खूप मोठी चिंताजनक बाब म्हणावी लागेल व अशीच घटना नींगणुर येथे घडली ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती अध्यक्षांनी गेल्या सोळा वर्षांपासून खुर्ची कायम करून अविरोध सम्राट बनण्याचे अनाधिकृत काम होत असताना हे लोकशाहीला धरून नाही व होणारा अन्याय याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर तंटामुक्ती समर्थकाने पत्रकार मैनोद्दीन सौदागर यांच्यावर भ्याड हल्ला केला याबाबतची तक्रार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आली व घटनेचा निषेध करण्यात आला व संबंधितावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
