राळेगाव येथे हास्यसम्राट डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांचा तुफानी विनोदी कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य शिवसेना तालुका राळेगाव (शिंदे गट ) द्वारा आयोजित येथील रसिकांसाठी हास्य सम्राट डॉ मिर्झा अहमद बेग ( झी टी व्ही मराठी हास्यसम्राट उपविजेते ) यांचा आज दिं ११ मार्च २०२३ रोज शनिवारला तुफानी विनोदी हास्यांच्या फवाऱ्यांची मेजवानी या कार्यक्रमाचे आयोजन क्रांती चौक येथे सायंकाळी ६:०० वाजता करण्यात आहे .
तरी तालुक्यातील तसेच शहरातील नागरिकांनी डॉ मिर्झा अहमद बेग यांच्या तुफानी विनोदी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तालुका शिवसेना प्रमुख मनोज भोयर, शहर प्रमुख तथा नगरसेवक संतोष कोकुलवार,शहर संघटक संदीप पेंदोर, अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष चाँदभाई कुरेशी, उपशहर प्रमुख नितीन हिकरे, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ.रंजनाताई केराम,महिला आघाडी शहर प्रमुख सौ.पार्वतीबाई मुखरे तथा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, राळेगाव यांनी केले आहे.