खैरी- मंगी, आष्टोणा -सावित्री पांदन रस्त्यावरील रपटा ठरतोय अपघातात निमंत्रण
(पावसाळ्यापूर्वी पांदन रस्ता दुरुस्तीची शेतकरी वर्गाची मागणी )

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खैरी ते मंगी ,आष्टोणा ते सावित्री पांदन रस्त्यांचे दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री निधीतून या परिसरात पांदन रस्त्यांचे काम झाले होते. परंतु यावर्षीच्या अतिवृष्टीने रपट्यावरील भर वाहून गेल्यामुळे ढोले उघडे पडून अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा पांदण रस्ता शेतकऱ्यांना शेत कामाकरिता जाणे येणे करित असताना अपघातास निमंत्रण देत आहे. तरी पांदन रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.
शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना शेतात जाता यावे याकरिता पांदण रस्ता ही मोहीम राबविण्यात येत आहेत परंतु या पांदण रस्त्याच्या कामात निकृष्टता दिसून येत आहे.सदर पांदण रस्ता योजनेसाठी शासन लाखो रुपयांचे खर्च करते परंतु याचा फायदा शेतकऱ्यांना होतांना दिसत नाही. कारण पांदण रस्त्याच्या कामात जास्त प्रमाणात चाल ढकलपणा दिसते. अशीच परिस्थिती राळेगाव तालुक्यात आष्टोणा ते सावित्री पांदण रस्त्यावरील मोहन कुत्तरमारे यांचे शेताजवळील रपट्याबाबत व मंगी ते खैरी पांदण रस्त्यावरील हिम्मत ठावरी यांच्या शेताजवळील रपट्याबाबत दिसून येत आहे. हया पांदण रस्त्यावरील नालिमध्ये टाकलेले ढोले पाण्याच्या पाण्याच्या प्रवाहाने उघडे पडून अस्ताव्यस्त झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना येता जाता खुप ञास होत असून अपघातांची शक्यता बळावली आहे. आता अवघ्या दीड महिन्यावर पावसाळा येऊन पोहोचला आहे तरी पावसाळ्यापूर्वी शेतकरी वर्गांना पांदन रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे
वरील सर्व गावे राळेगाव तालुक्यातील असुन नुकतेच दोन वर्षापूर्वी मा. पालकमंत्री यांचे निधीमधुन पांदनरस्त्याचे काम झालेले असुन शासनाच्या धोरणानुसार गाव तिथे शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरीता पांदण रस्ते निर्माण केलेले आहे. परंतु वरील सर्व रस्ते नाल्यावरील रपट्यामुळे जीव घेणे ठरत आहे. बंडी बैल, वाहने कशी न्यावे हा प्रश्न पडलेला आहे. बरेचदा या रस्त्याबाबत लोकप्रतिनिधीना व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळविले असता कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे केव्हा कोणती हाणी होईल नाकारता येत नाही. तरी या बाबीकडे लक्षदेऊन या पांदण रस्त्यांवरील रपटा करून देण्यात यावा व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे व तसेच या रोडचे खडीकरण व डांबरी करण शासनाच्या योजनेतून करून देण्यात यावे. अशी आष्टोणा, खैरी, मंगी, सावित्री ग्रामस्थांची मागणी आहे.