
सहसंपादक -रामभाऊ भोयर
ग्रामपंचायतीला हस्तांतर करण्यात आलेल्या अतिक्रमीत ई क्लास जमनींवरील अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
सन 2011मध्ये रिधोरा गावा लगत असलेल्या इ क्लास जमिनीवर लाडकी येथील शेषेराव भदुजी केराम, वय ५० वर्षे, मारुती उदेभान वगार हांडे, वय ३५ वर्ष, सौ. रंजना राजू वावरे, वय ३३ वर्ष, लक्ष्मण भदुजी केराम, वय ४४ वर्षे यांनी लाडकी येथील इकलासच्या जमिनीवर अतिक्रमण करून ती जमीन २०११ मध्ये ताब्यात घेतली होती. सदर ही जमीन ग्रामपंचायतला हस्तांतर असल्याने ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन त्या जमिनीवर वृक्ष लागवड करण्याचे ठरविले होते परंतु त्या जमीनीवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले असल्याने चहांद ,लाडकी गट ग्रामपंचायत ने या अतिक्रमण धारकावर २०११ मध्ये कोर्टात केस दाखल केली होती. या केसचा निकाल २०१४ मध्ये कोर्टाने ग्रामपंचायतच्या बाजूने दिला होता परंतु काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ग्रामपंचायत ने ती जमीन अजून पर्यंत ताब्यात घेतली नव्हती. तांत्रिक अडचणी दूर होताच महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या मदतीने दिनांक १८ एप्रिल रोजी ही अतिक्रमित जमीन अतिक्रमन मुक्त केली असून ती जमीन ग्राम्पचसायतीच्या ताब्यात देण्यात आली आहे. यावेळी चहांद लाडकी गट ग्रामपंचायतच्या सरपंच सौ रूपाली शंकर राऊत, उपसरपंच सौ कविता चांदेकर व ग्रामपंचायत सदस्य निखिल शेळके, प्रमोद येडे, विठ्ठल ससाने, मोहन केराम, सुदर्शना कांबळे, कलावती चामाटे, रूपाली जवादे, संजय झिरपे सचिव, व महसूल विभागाचे अधिकारी एन. डी. बेंडे, नायब तहसीलदार राळेगाव, एम.डी. सानप, मंडळ अधिकारी वडकी, सरिता सिडाम तलाठी चहांद व वडकी पोलीस स्टेशनचे रमेश मेश्राम, विना गेडाम, किरण दासारवार, उपस्थितीत होते. ही जमीन ग्रामपंचायत ने ताब्यात घेताच परिसरातील अतिक्रमण धारकांचे धावे दणाणले आहे. परिसरातील काही गावांमध्ये सुध्दा अशाच प्रकारे अनेकांनी अतिक्रमण केले आहे.
