राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत त्री शंकू घमासान

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 26 उमेदवारी अर्ज आज मागे घेण्यात आले त्यात विशेष रवींद्र निवल यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने चर्चाचा विषय दिसून येते, राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम तारीख होती आज अंतिम दिवशी 26 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले तर सोसायटी गट व ग्राम पंचायत गटामध्ये नामांकन दाखल करणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रवींद्र किसनराव निवल यांच्या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज रद्द झाली आहे रवींद्र निवल यांच्या पत्नी वर्षा निवल या महावीर कोटेक्स या कापूस उद्योगाशी संबंधित असल्याने त्यांचे नाव कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी अडत अंतिम मतदार यादी क्रमांक 24 वर समाविष्ट आहे तसेच त्यांच्याकडे व्यापारी अनुज्ञाप्ती असल्याने महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम 2017. 10(2) नियमनुसार निवडणूक लढण्याकरता त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे हा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिला आहे त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे त्यांच्या उमेदवारीवर सुधीर जवादे यांनी आक्षेप घेतला होता तसेच विविध गटातील 26 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतली आहे उद्या चिन्हाचे वाटप झाल्यानंतर गट निश्चित होईल तरीही सर्वात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पुढील *कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव
विड्राल नंतर शिल्लक राहिलेल्या एकूण नाम निर्देशन संख्या
सहकारी संस्था मतदार संघ
सर्वसाधारण 18
महिला राखीव 4
इतर मागासवर्गीय 2
विजा भज 3
ग्रामपंचायत मतदार संघ
सर्वसाधारण 6
अनुसूचित जाती जमाती 5
आर्थिक दृष्ट दुर्बल घटक 2
व्यापारी अडते मतदारसंघ 4
हमाल मापारी व तोलारी मतदारसंघ 3एकूण 47उमेदवार रिंगणात असून मात्ताबर यांचे धाबे दनवल्याचा सूर शेतकरी वर्गात दिसून येत आहे त्या मुळे विरोधक यांची रणनीती काम करेल का ?असा प्रश्न तालुक्यात दिसून येत आहे
.