
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
ढाणकी येथील हनिफ मास्टर उर्दू माध्यमिक विद्यालयाचे सहायक शिक्षक मो.अशफाक मो.इकबाल यांच्या सेवानिवृत्ति निमित्त शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी निरोपसमारंभ व सत्काराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आइडियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सैयद मक्सूद अली पटेल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर पंचायत चे उपाध्यक्ष हाजी शेख जहीर जमीनदार, सैयद इमाम, हाजी शेख इब्राहिम, सैयद नौशाद अली, सैयद इमरान अली आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात येथील शिक्षक जावेद खान यांनी कुरान ए पाक ची तिलावत करुन केली त्यानंतर शाळेतील विध्यार्थीनीने नाते पाकचे पठन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सैयद मकसूद अली पटेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व मो.अशफाक यांच्या कार्याचा उल्लेख करुन त्यांच्या दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मो. अशफाक यांना शाल व भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी यावेळी आपले विचार व्यक्त व्यक्त केले . सत्काराला उत्तर देतांना मो.अशफाक यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सेवेत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सैयद जहीरोद्दीन यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सैयद आबीद सर यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.
