
काही वृत्ता मध्ये बातम्या प्रकाशित होताच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला आली जाग. महिलांनी मानले बातमी प्रकाशित करणाऱ्या वृत्तांचे आभार
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील येवती येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या कामात भोंगळ कारभार होत असल्याची तक्रार येथील काही महिलांनी गटविकास अधिकारी केशव पवार राळेगाव यांच्याकडे दिली होती. याच तक्रारीच्या बातम्या काही वृत्तामध्ये प्रकाशित करण्यात आल्या होत्या या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अखेर महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला. सविस्तर वृत्त असे येवती येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवत असलेल्या महिला बचत गटांनी मार्चमध्ये गटविकास अधिकारी राळेगाव यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली होती. सदर ही तक्रार अरुणा शंकर जोगी, सुनिता सुनील गावंडे व चंदा किशोर कुबडे यांनी केली होती. सदर या तक्रारीमध्ये उमेद च्या काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला व आमच्याकडून एक ते दीड वर्ष काम करून घेतले व आमच्या नावावर परस्पर पगाराची उचल करून आम्हाला पगार दिला नाही असे या तक्रारीत नमूद केले होते. सदर या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकारी केशव पवार तथा उमेदचे वरिष्ठ अधिकारी यांनी येवती येथे महिलांची मीटिंग घेऊन सर्व महिलांची समजूत घालून सदर एक ते दीड वर्ष काम केलेल्या महिलांना अखेर कामाचा मोबदला देण्यात आला आहे. सदर यामध्ये सौ. अरुणा शंकर जोगी यांनी आयसी आरपी म्हणून एक ते दीड वर्ष काम केले होते. त्यांच्याही कामाचा त्यांना मोबदला म्हणून १२ ६०० रुपयांचा चेक देण्यात आला तर कृषी सखी म्हणून काम करणाऱ्या सौ. सुनिता सुनील गावंडे यांनाही २४३७० रुपयांचा चेक देण्यात आला तसेच पशु सखी म्हणून काम करणाऱ्या सौ. चंदा किशोर कुबडे यांनाही त्यांच्या कामाचा मोबदला देणार असल्याचे महिलांनी सांगितले आहे. सदर तालुक्यात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून या कामावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कडी नजर ठेवून हे काम करावे. असे काही महिला कडून बोलल्या जात आहे.सदर या कामांमध्ये महिला सक्षमीकरण झाले असे सांगून उमेद मधील काम करणारे काही अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचेही महिलांकडून सांगितले जात आहे. सदर या प्रकरणात येवती येतील महिलांना न्याय मिळाल्याबद्दल त्यांनी दैनिक वृत्ताचे आभार मानले आहे.
असा प्रकार येवती गावातच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये आहे. असे मला वाटते ? परंतु तालुक्यातील महिला कधीही पुढे येऊन आपली समस्या सांगू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. आज आमच्या सोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार आम्ही गटविकास अधिकारी केशव पवार राळेगाव यांच्याकडे दिली होती व हा संपूर्ण प्रकार आम्ही दैनिक वृत्त वाल्यांना सांगितला. याची दखल घेत दैनिक वृत्तामध्ये बातम्या प्रकाशित केल्या त्यामुळे आज आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळाला आहे. त्यामुळे मी आणि माझ्या टीमच्या वतीने दैनिक वृत्ताचे व गटविकास अधिकारी केशव पवार यांचे आभार मानले आहे.
सौ. अरुणा शंकर जोगी येवती (आयसीआरपी )
