
सहसंपादक -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरी सर्वात मोठे गाव म्हणून खैरी या गावाचे नावलौकिक आहे. तसेच तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू खैरी हे गाव आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाणारी खैरी ग्रामपंचायत सध्या गावकर्यांना सुविधा पुरविण्यास अक्षम्य शून्य दिसत आहे. पाणी, रस्ते, आरोग्य व प्रकाश व्यवस्थेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. खैरी गावात सर्व गावांना पाणी पुरवठा करणारी सटवाई ची विहीर आहे परंतु त्या विहिरीपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नाही तसेच विहिरीवरून टाकीपर्यंतची पाईपलाईन जागोजागी फुटत असून नवीन पाईपलाईन टाकण्याकडे प्रभारी सचिव व उदासीन प्रशासन ह्या महत्त्वाच्या मूलभूत सुविधा कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे .
खैरी येथील गावकर्यांनी गावाच्या सर्वांगीन विकास साधण्यासाठी मोठ्या विश्वासाने खैरी ग्रामपंचायतवर११ सदस्य निवडून दिले पण पक्षाला जागरूक न राहता काही उमेदवारांनी युती एकासी व संसार थाटला दुसऱ्यासी असे चित्र घडले. लोकांनी उमेदवार पाहून गाव हितासाठी उमेदवार निवडून दिले निवडून आलेले कारभारी आम्ही गावाचा कायापालट करू असा विश्वास संपादीत करत आणाभाका घेतल्या. मात्र आज दोन वर्षे लोटली तरी गावाचा कायापालट झाला नाही. खैरी गावाला व्हि.डि.ओ. ची पोस्टिंग असताना प्रभारी सचिव ही ग्रामपंचायत सांभाळत आहे त्यामुळे विकासाच्या नावावर सगळीकडे बोंबाबोंब होतं आहे, गावाचे पाणीपुरवठा नियोजन खूपच ढासळले असून ग्रामपंचायत हद्दीतील अनेक भागात विद्युत खांबावरील काही पथदिवे बंद राहतात, यामुळे प्रशासनाचा अंधार दिसून येतो.
ग्रामपंचायत परिसरात अस्वच्छता पसरली आहे, तसेच ग्रामपंचायत च्या बाजूलाच मटन मार्केट आहे कोंबड्याचा पंख विखूरलेले असतात त्याचा योग्य तो विल्हेवाट लावल्या जात नाही. गुरा ढोरांना पिण्याच्या पाण्याचे टाके असूनही टाके साफ करण्यास त्यांना फुरसत मिळत नाही, त्याच टाक्याभोवती अस्वच्छता दिसून येते गावातील काही रस्त्याची बिकट अवस्था आहे, रस्त्यावर मोठया प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे, आज रोजी रस्त्याने साधी एक बैलगाडी जाण्यायोग्य शिल्लक रस्ता राहला नाही इतकंच नाही तर, अशा एक ना अनेक समस्यांनी खैरी गाव ग्रासलेलं आहे. मात्र यावर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. पदाधिकारी फक्त खुर्च्या दाबत बसले आहे.
वास्तविक ग्रामीण भागातील प्रशासन म्हणजे ग्रामपंचायतच. गावकर्यांना सार्वजनिक आरोग्य, प्रकाश व्यवस्था, दळणवळनासाठी रस्ते, पाणीपुरवठा आदी दैनंदिन जीवनाशी निगडित सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असते. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे पाणीपट्टी, मालमत्ता, विज व आरोग्य आदी करांची वसुली गावकर्यांकडून केली जाते. यात लाखो रुपयांचा महसूल वसुल केला जातो. परंतु सुविधा पुरविण्याकडे लक्ष दिले जात नाही. मागील वर्षी ग्रामपंचायत प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून गावातील वार्डात कचरा कुंड्या बसवील्या मात्र आज घडीला त्या कचरा कुंड्या जंग खाऊन खराब झाल्या तर काही जाग्यावरच सडलेल्या अवस्थेत आहे. कचराकुंड्या किती आणल्या व त्या गावात किती बसवल्या यावर एकाही पदाधिकाऱ्यांनी वाचता केली नाही.यावर खैरी ग्रामपंचायतचे पदाधिकारी आपल्या कामात किती शिस्तबद्ध आहे हे यावरून खैरीकराना दिसून येते आहे.
गावातील वार्डातून ग्रामपंचायत प्रशासन कर सक्तीने वसुल करू शकते. परंतु सुरळीत पाणी पुरवठा का नाही करू शकत, नाल्या नाही, सार्वजनिक आरोग्याचा अभाव आहे. नागरिक समस्या ग्रामपंचायत कडे घेऊन जातात. पण त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याची ओरड गावकर्यांकडून होत आहे. सदस्यांसह ग्रामपंचायत प्रशासनाचे नागरिकांच्या या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रामपंचायत घेरली असून पुढार्यांनो कुठे नेऊन ठेवली खैरी ग्रामपंचायत असा सवाल खैरी ग्रामवासी करित आहे.
