महामानव बिरसा ची क्रांती ही आदिवासी समाजातील व्यक्ती ला सामाजिक चळवळीची प्रेरणा देणारी होती – मधुसूदन कोवे गुरुजी

सहसंपादक:- रामभाऊ भोयर


क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या वतीने “‘ बिरसा अभिवादन यात्रा “‘ चे आयोजन केले होते जिल्हा परिषद वरध सर्कल मध्ये बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यासाठी आणि समाजातील लोकांना पुतळ्याची माहिती देण्यासाठी अभिवादन यात्रा काढण्यात आली होती “‘बिरसा अभिवादन यात्रा”‘ चे नेतृत्व मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी केले होते पिंपळखुटी,वरुड (जहांगीर ) सराटी, सावरखेडा, आटमुर्डी मार्गे आंजी ला अभिवादन यात्रा ची मार्गदर्शन सभा घेण्यात आली – या मार्गदर्शन सभेच्या अध्यक्षस्थानी मा बळवंतराव मडावी प्रदेश कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी मुख्य मार्गदर्शक मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा ताराबाई सोयाम सरपंच ग्राम पंचायत आंजी,मा विठ्ठलराव धुर्वे जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ मा अशोकराव कोवे माजी सरपंच ग्रामपंचायत सराटी मा मारोतराव सोयाम जिल्हा समन्वयक गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ मा ताराबाई कोटनाके जिल्हा उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ मा मधुकरराव आडे मा कलावती उईके तालुका अध्यक्ष कळंब यांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याच अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या कार्याची माहिती सांगण्यात आली गावा गावात मोठा प्रतिसाद मिळत होता यात प्रविण वड्डे , विठ्ठलराव ठाकरे, मारोतराव शिरबंदी वसंतराव आत्राम, मारोतराव सिडाम, सुभाषराव वड्डे, मीनाताई सराटे गीता वड्डे इंदुबाई सराटे मनिषा कोवे, सविता तोडासे सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.