
माहागाव प्रतिनिधी :-संजय जाधव
दि.१५ जुन रोजी,सामाजिक कार्यकर्ते किशोर भवरे यांच्या वतीने व लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या विद्यमानाने भव्य रोगनिदान,मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये फुलसावंगी परिसरातील जवळपास ७०० ते ८०० गरजु रुग्णांनी सहभाग नोंदविला.तसेच या शिबिरामध्ये तपासणी झालेल्या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नांदेड येथे नेऊन त्यांच्यावर लॉयन्स नेञ रूग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.असे सामाजिक कार्यकर्ते श्री किशोर भवरे यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.डॉ वजाहत मिर्झा आमदार विधान परिषद.प्रमुख पाहुणे म्हणून सचिन नाईक,विजय खडसे.तातू देशमुख,किशोर भवरे,जानी कमर बेग,स्वप्निल नाईक,विजय महाजन,कुणाल नाईक,बाबू खान पठाण,नागोराव ढोले,दिनेश नाईक,माजी ऊपसरपंच नासिर खान, मायरा हॉस्पिटल चे संचालक डॉ खुपसे पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश वानखेडे व पत्रकार सघं यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनेकांनी सहभाग घेतला.
