
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
यावर्षी कापसाला मुहूर्तावर निघालेला नऊ ते साडेनऊ हजाराच्या भावाने शेतकऱ्यांमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण होते कापसाचे भाव वाढणार या आशेवर शेतकऱ्यांनी गेल्या आठ महिन्यापासून घरात कापूस साठवून ठेवला आहे परंतु बाजारात भाव वाढत नसल्याने त्यात खरिपाच्या पेरणीसाठी आर्थिक तडजोड करून मिळेल त्या भावात साठवून ठेवलेला कापूस शेतकऱ्यांना विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांची कळवळा कोणी जाणे ना अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मागील वर्षी मिळालेल्या भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चांगल्या भावाची अपेक्षा होती.तसा सुरुवातीला कापसाला चांगला भाव मिळालाही त्यानंतर मात्र कापसाचे भाव पुन्हा गडगडले नाही सध्या खरिपाच्या पेरणी करिता शेतकरी आपल्या घरातील असलेला कापूस विकत असून ही शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता व्यापारी सहा हजार आठशे ते ७२०० रुपये प्रति क्विंटल भावने घेत आहे मात्र या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
मागीलवर्षी कापसाला १० हजार ते १४ हजार रुपये भाव मिळत होता तेव्हा मात्र शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात कापूस होतात कापसाच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात गती मिळाली त्यानंतर कापसाला चांगल्या प्रमाणात भाव मिळाला त्यावेळी मात्र हा भाव शेतकऱ्यांना न मिळता व्यापाऱ्यांना मिळाला होता.
यावर्षी कापसाची भाव वाढ होईल या आशेने पन्नास ते साठ टक्के कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढण्याची प्रतीक्षा करीत घरात कापूस साठवून ठेवला होता कापसाचे बाजार भाव सात हजार ते साडे सात हजाराच्या घरातच असून शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर नाईलाजाने आपला कापूस विकावा लागत असून शेतात पेरणी साठी खते बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कापसाला झराळी मिळालीच नाही
पांढऱ्या सोन्याचे भाव वाढ होत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे खर्च अधिक आणि भाव कमी अशा दुहेरी संकटात शेतकरी आहे त्यामुळे सरकारचे धोरणच जबाबदार असल्याच आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
