
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत सुरू असलेल्या एक गाव एक शनिवार या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी राळेगाव तालुका गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ते मंडळी नियोजित गावाला भेटी देत असतात.
याच भेटीमध्ये आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या समस्या जाणून त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न गुरुदेव सेवा मंडळातील निष्ठावंत कार्यकर्ते वाढोणा बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते शेर अली बापूसाहेब करीत असतात आज शेर अली बापू साहेब यांच्याकडून राळेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये बसण्याकरता प्रार्थनेच्या मुलांना म्यॅटिंग भेट दिल्या
याच वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सुंदर अशा प्रतिमा सुद्धा भेट देण्यात येतात. अशा या उपक्रमामध्ये राळेगाव तालुका सर्वाधिकारी मा.घनश्यामजी फ़टिंग, डॉक्टर ज्ञानेश्वर मुडे, निर्वाचन अधिकारी गुरुकुंज आश्रम, शेर अली बापूसाहेब वाढोणा बाजार, सचिन झाडे, उपसर्वाधिकरी, अंबादासजी लालसरे,वावरे, हरिभाऊ कुबडे, सतीश पाटील, शिवशंकर घोटेकर, भटकर सर, प्रकाशजी झलके, भेदुलकर सर,गजानन महाराज सुरकर, रुपेश रेंघे, जिल्हा युवा संघटक, इ गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते एक गांव एक शनिवार या उपक्रमात सहभागी होत असतात.
