वीस हजार हेक्‍टरवर शेतकऱ्यांचा जुगार , अर्धा मृग कोरडाच पावसासाठी वरूण राजाला साकडे धुरळ पेरणी करणारे शेतकरी चिंताग्रस्त

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

पावसाळी नक्षत्र म्हणून ओळखले जाणारे मृग पावसाचे पहिले नक्षत्र होय हे मृग नक्षत्र हत्तीवर आरूढ होऊन आगमन झाले मात्र मृग नक्षत्र सुरू होऊन पंधरा दिवसाचा कालावधी लोटला असूनही अद्यापही पाऊस झाला नाही प्रशासनाने १०० मी.मी पाऊस पडला शिवाय पेरणी करू नये असे आवाहन केल्यानंतर ही तालुक्यातील ५० टक्के शेतकऱ्यांनी कापसाची धुरळ पेरणी केली आहे त्यामुळे जवळपास २० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी जुगार खेळला असून येथे चार पाच दिवसात पाऊस झाला नाही तर कापसाची धुरळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार हे निश्चित आहे. त्यामुळे धुरळ पेरणी करणारे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे
मागील वर्षी मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने खरिपाच्या मोठ्या प्रमाणात आटोपल्या होत्या यावर्षी रोहिणी नक्षत्र कोरडे गेले त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा मृग नक्षत्राकडे लागल्या होत्या त्यामुळे आज ना उद्या पाऊस बरसेल या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी धुरळ पेरणी केली असून शेतकरी पावसाची चातका सारखी वाट पाहू लागला आहे.