वणी शहरात लपून छपून चालणारा जुगारावर ठाणेदारांची धाडसत्र सुरू


वणी प्रतिनिधी : नितेश ताजणे

शहरात जागोजागी मटका पट्टी, जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती नव्यानेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक अजित जाधव ठाणेदार पो.स्टे. वणी यांना मिळताच त्यांनी वेगवेगळे पथक तयार करून विविध 7 ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकुण 17 आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्यावर जुगार कायद्याअंतर्गत कारवाई करुन एकुण 3 लाख 32 हजार 870 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक 14 जुलै शुक्रवारी व 15 जुलै शनिवार ला शहरातील एकता नगर कॉमप्लेक्स, एकता नगर, नगर परीषद कॉमप्लेक्स , सिटी पॉईन्ट बार जवळ, गंगाविहार कॉलनी येथील बंद असलेल्या एका घरात अवैध्यरित्या लपुनछपुन चालणा-या जुगार अड्यावर पोलीसांनी धाडी मारुन एकुण 7 गुन्ह्यातील 17 आरोपीवर जुगार कायद्या अंतर्गत कार्यवाही करुन एकुण 3 लाख 32 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले असून शहरातील जागोजागी सुरू असलेल्या मटका पट्टी अड्ड्याकडे शुकशुकाट जाणवत होते.

सदरची कार्यवाही मा. डॉ. पवन बन्सोड – पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप – अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा.गणेश किंद्रे – उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक / अजित जाधव, ठाणेदार पो.स्टे. वणी यांचे आदेशाने पो.स्टे. अधिकारी, अंमलदार यांनी केली आहे.