
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
आज दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास आरोपी शिवाजी दशरथ नारमवाड वय 30वर्ष रा. चिंचाळा ता. भोकर जि. नांदेड याने चरित्र्याचा संशय मनात धरून पत्नीचा धारदार लोखंडी सुरीने मृतकाच्या मानेचे उजव्या बाजूला वार करून वडिलांच्या राहत्या घरी वार्ड क्र. दोन मधील ढाणकी येथे सौ. कविता शिवाजी नारमवाड हिचा खून केला आहे. आरोपी शिवाजी दशरथ नारामवाड य आरोपी हा आपल्या पत्नीपासून विभक्त राहत होता.पुढील तपास मा. डॉ. पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ मा. प्रदीप पाडवी उप. वि. पोलीस अ. यांच्या मार्गदर्शनात तपास ठाणेदार सुजाता बनसोड मॅडम हे करीत आहे
