
आपत्तीमध्ये व आपत्ती नंतरही TDRF नागरीसेवेसाठी कार्यरत : TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन घरात पाणी घुसून नागरिकांना बेघर व्हावे लागले. त्यांच्या या परिस्थितीत त्यांची मदत केली जात आहे. अश्यातच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मागील 18 वर्षापासून कार्यरत TDRF द्वारा राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील पूरग्रस्त (पीडित) नागरिकांची माहिती घेऊन TDRF मुख्यालयाच्या वतीने TDRF संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात तेथील नागरिकांना दि. २१/०८/२०२३ रोजी मेडिकल किटचे वाटप TDRF राळेगाव कंपनीच्या अधिकारी व जवनानकडून करण्यात आले. त्या मेडिकल किट मध्ये डेटॉल साबण, डेटॉल लिक्विड, सॅनिटरी पॅड, बँडेजेस, आय ड्रॉप, पॅरासिटामॉल टॅबलेट, सिपला डाइन पावडर इत्यादी. जीवनावश्यक वस्तू होत्या.
सदर मेडिकल किट वाटप कार्यक्रमाच्या वेळी झाडगाव चे सरपंच बाबाराव किन्नाके व उपसरपंच रोशन कोल्हे सोबतच TDRF राळेगाव कंपनी कमांडर आर्यन खिरकर, शिल्पा सोयाम,ओम डफ,सुयोग निमट, साहिल गुजरकर, सुहानी मडावी, स्नेहा ठाकरे, घनश्याम आंबटकर, योगिता भडे,शिवम मोरे इ. TDRF अधिकारी व जवानांनी मेडिकल कीटचे वाटप केले.त्यावेळी उपस्थित गावकर्यांनी TDRF च्या कार्याचे कौतुक करून आभार मानले.
