
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
*शाळेचा निकाल 80 (राळेगाव )-महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला असून राळेगाव येथील संस्कृती संवर्धन विद्यालयाचा निकाल 80 % इतका लागलेला आहे.
या निकालामध्ये सर्वदूर मुलींनीच बाजी मारली असूनही मात्र शाळेतून प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान सुजल संजयराव वाऱ्हेकर 80 % या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. यानंतर अनुक्रमे द्वितीय क्रमांक कु. प्रतीक्षा कुडमेथे 74:20%, तृतीय क्रमांक कु. भूमिका जाधव 73:20%, चतुर्थ क्रमांक कु. प्राची भगत 72:80%, पाचवा क्रमांक कु. ऋतुजा भोकरे 68:60% या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेला आहे.शाळेतून 1 विद्यार्थी प्रविण्य प्राप्त असून, 6 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 11 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत,10 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. विद्यार्थ्यांची ग्रामीण पार्शवभूमी असतानाही संघर्षातून मेहनतीने शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवता येथे हे सिद्ध करून दाखविले. शाळेकडूनही विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्ग, सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन, विविध उपक्रम यामध्ये शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, पालकांचा मोठा वाटा आहे.
निकालानंतर शाळेच्या वतीने प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांचा व विशेष म्हणजे पालकांचा शाल -श्रीफळ, आईचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या या निकालाबाबत संस्थेचे संचालक श्री. दिपकराव एम्बडवार, मुख्याध्यापक श्री. दिनकर उघडे, ज्येष्ठ शिक्षिका कु. सीमा देशमुख तसेच शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
