
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील औषध विक्रेत्यांनी 20 मे 2026 रोजी एकदिवसीय “ऑल इंडिया केमिस्ट्स बंद” ची हाक दिली आहे. यात राळेगाव तालुका संघटना देखील सहभागी असून अनागोंदी कारभाराचा निषेध संघटनेचे तालुकाध्यक्ष आनंद तुरणकर यांनी केला आहे .ऑनलाइन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिले जाणारे अव्यवहार्य डिस्काउंट आणि बनावट औषधांच्या वाढत्या समस्येविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.
या विषयावर केमिस्ट व्यावसायिकांची बैठक राळेगाव येथे पार पडली .एकमताने या बंद मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला
संघटनेची प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केंद्र सरकारने ऑनलाइन औषध विक्री तातडीने बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त सवलतींमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
AIOCD चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी या विषयावर वस्तुनिष्ठ मांडणी केली आहे ., “ऑनलाइन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होत असून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. बनावट औषधांच्या विक्रीलाही यामुळे खतपाणी मिळत आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.”
महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने देखील या बंदला पाठिंबा दर्शवला असून राज्यातील हजारो मेडिकल दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनामुळे 20 मे रोजी अनेक भागांत औषध खरेदीसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र अत्यावश्यक औषध सेवा सुरू ठेवण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.
संघटनांच्या मते, सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
