समाजसेवक ,भा ज पा नेते विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन ,शहनाज अख्तर यांच्या सुरेल आवाजात भक्तीमय गीतांचा कार्यक्रम

प्रतिनिधी नितेश ताजने वणी

जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणी च्या विद्यमाने शहरातील प्रसिद्ध व्यावसायीक, भाजपाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते मा. विजय बाबु चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सुविधा मंगल कार्यालय मारेगाव येथे करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणी, बजरंग दल यवतमाळ जिल्हा, विश्व हिंदू परिषद व आदर्श महिला बहुउद्देशीय संस्था मारेगाव यांनी केले आहे तर १ सप्टेंबर ला कायर येथिल कोळी समाज मंदिर येथे मोफत नेत्र शस्त्रक्रिया व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर, २ सप्टेंबर ला जैताई मंदीरात सकाळी १० ते ४ या वेळात नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तर
४ सप्टेंबर ला सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांची भजन संध्या सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भजन संध्या रंगणार आहे. “मुझे चढ गया भगवा रंग…” अशा गाजलेल्या मराठी भजन गीतांचा कार्यक्रम शासकीय पाण्याची टाकी मैदानावर रंगणार आहे. तरी श्रोत्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वणी, बजरंग दल यवतमाळ जिल्हा व विश्व हिंदू परिषदेने केले आहे.