अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

वणी: प्रतिनिधी नितेश ताजणे

वणी तालुक्यातील देहगाव शिवारात अचानक झालेल्या पावसात शेतात काम करणाऱ्या मनोज पांडुरंग गोहकर (३५) या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दि.४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

देहगाव परिसरात आज दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी वादळी वारे सुटले होते. या काळात देहगाव शिवारात वीज कोसळली. दहेगाव येथील मनोज पांडुरंग गोहकार हे शेतात काम करत असताना, वारे सुटल्याने ते शेतातील बंड्याकडे जात असतानाच त्यांच्या अंगावर वीज पडली व ते जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई वडील दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. घटनेनंतर त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.