मौजे सारखनी येथे स पो नि श्री सुशांत किनगे यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न

आगामी गणेश उत्सव लक्षात घेता. सिंदखेड पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सण उत्सव व इतर वेळी सुद्धां गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांची भूमिका महत्वाची आहे. व तसेच सर्व मंडळांचे विसर्जन वेळेवर व्हावे आणि सर्व प्रकारच्या परवानगी काढावी कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करूनच प्राधान्य करावे असे मत सिंदखेड पोलीस स्टेशन चे प्रभारी सुशांत किनगे यांनी व्यक्त केले.
गावकऱ्यांच्या उपस्थितीत नेहमी प्रमाणे जुन्या समस्या नव्याने मांडल्या टेशन प्रभारी सुशांत किनगे यांनी नेहमी प्रमाणे उपाय योजना काढायचे आश्वासन दिले.
स पो नि सुशांत किनगे यांनी गावकऱ्यांना संबोधित करत शंताता व सु व्यवस्था स्थापित ठेवण्याचे आव्हान देखील केलें साद्रिल शांतता मीटिंग मध्ये गावकऱ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने लाभला असून गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे