131 रक्तदात्यांनी केले रक्तदान, निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण ( युवा गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम, तहसीलदार, पो. नि. पत्रकार यांची उपस्थिती )

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

   

युवा गणेश उत्सव मंडळ राळेगाव चे वतीने निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण व रक्तदान शिबीर उदघाटन सोहळा पार पडला . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तहसीलदार अमित भोईटे, मुख्य मार्गदर्शक मनिष काळे, जेष्ठ पत्रकार महेश शेंडे, पो. नि. मोहन पाटील, राजेंद्र दुधपोळे आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिरात विक्रमी 131 रक्तदात्यांनी रक्तदान केले .
उदघाट्न सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून व्यक्त होताना तहसीलदार अमित भोईटे यांनी मंडळाच्या रक्तदान व निबंध स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहेच त्या सोबतच मतदान हे देखील राष्ट्रीय कर्तव्य आहे ते आपण बजावले पाहिजे. या करीता मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु आहे यात नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. मुख्य मार्गदर्शक मनिष काळे यांनी टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उद्देशाची परिपूर्ती करणारे कार्य मंडळ करीत आहे असे भाष्य केले.धार्मिकते सोबतच समाजोपयोगी उपक्रम महत्वाचे. खास करून शेतकरी आत्महत्याचा आक्रोश असतांना आपण उत्साहाचे रूपांतर उन्मादात न करता विधायक मार्ग स्वीकारला. अशी भावना व्यक्त केली. विविध दाखले देत त्यांनी विषयाची रंजकता वाढविली.जेष्ठ पत्रकार महेश शेंडे यांनी आज लिखानाची सवय तुटतं चालली आहे. युवा पुढीने आपले मत मांडले पाहिजे लिखाणाच्या सरावात सातत्य ठेवा ही अपेक्षा व्यक्त केली. पो. नि. मोहन पाटील यांनी मंडळाचे सदस्य अंत्यत चांगला उपक्रम राबवित असल्या बाबत समयोचित विचार मांडले.निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी अनेकांनी रक्तदान करून या विधायक कार्यात सहभाग नोंदवला. गोपाल मश्ररु यांनी 51 वेळा तर बाळू धुमाळ यांनी 53 व्या वेळी रक्तदान केले. युवा उद्योजक हृषीकेश मेंडोले,पो. नि. मोहन पाटील यांनी देखील रक्तदान केले.
या वेळी युवा गणेश उत्सव मंडळाचे सदस्य विनय मुनोत, शशिकांत उर्फ बाळू धुमाळ, रुपेश बोरकुटे, ऍड वैभव पंडित, दर्शन मुनोत, शुभम दुधपोळे, शुभम ठाकरे, भूषण बोथरा, साहिल नगराळे,जश गुंदेचा,असीम शेख, हर्षल नेहारे,शुभम मुके,सुयश कारिया, प्रथमेश राऊत,आकाश पिंगळे,हेमंत धोटे,वैभव देशमुख, रजत रुपारेल,प्रतीक कटारिया ,शुभम ब्राम्हणवाडे यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम उत्साहाने व यशस्वीरीत्या पार पाडला .