
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा तालुक्यातील विविध ठिकाणी श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची 399 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी पोंभूर्णा शहर व ग्रामीण भागात समाजबांधवांनी प्रतिमा पुजन, दिंडी,शोभायात्रा,बाईक रॅली, रक्तदान शिबीर,मार्गदर्शनपर कार्यक्रम आदी घेण्यात आले.
यावेळी जयंती निमित्त साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रांतीक तेली समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष गुरुदास पिपरे,शहर अध्यक्ष डॉ.नैताम, जिल्हा उपाध्यक्ष बंडू बुरांडे,ईश्वर नैताम, विनोद धोडरे, राकेश नैताम, नरेंद्र धोडरे आदी गावात जाऊन समाजबांधवांना मार्गदर्शन केले.
संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले अशी माहिती मान्यवरांनी मार्गदर्शनातून केले.
पोंभूर्णा येथे संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याचे विधीवत पुजन व माल्यार्पन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.बाईक रॅली व शोभायात्रा काढण्यात आली.नंतर कसरगट्टा,घनोटी,विहिरगाव,बोर्डा बोरकर,बोर्डा झुल्लुरवार,चेक हत्तीबोडी,जामतुकूम,जामखुर्द,थेरगाव येथे समाज बांधवांनी दिंडी,शोभायात्रा व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.देवाडा खुर्द येथे शोभायात्रा, रक्तदान शिबीर,किर्तन,बाईक रॅली आदी भरीव कार्यक्रम घेण्यात आले.तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात झालेल्या जयंती निमित्त कार्यक्रमात समाजबांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
