
प्रतिनिधी : शेख रमजान बिटरगांव ( बु )
पिग्मी खाते एक असे खाते आहे ज्या मध्ये लोक आपली दैनंदिन ठेव बँकेत जमा करत असतात. पतसंस्थेमधे प्रतिनिधी म्हणून काम करणारा कर्मचारी म्हणजे पिग्मी एजन्ट होय. हाच पिग्मी एजन्ट दरदिवशी येऊन आपली रक्कम घेऊन त्यावर एन्ट्री(खात्यावर जमा केल्याची नोंदणी) करतो व पैसे जमा करून घेतो. हेच पैसे पिग्मी एजन्ट ला नंतर बँक मधे जमा करावे लागतात. खातेदाराला प्रत्येक वेळी बँकेत जाणे शक्य नसल्याने ही रक्कम घेण्यासाठी बँकांनी पिग्मी एजंट नेमले आहेत. ते दररोज दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन ही बचतीची रक्कम संकलित करतात. या जमा रकमेच्या कामापोटी त्यांना बँकेकडून दीड ते दोन टक्के रक्कम मोबदला म्हणून दिले जाते. असे असून ही कित्येक वेळेस पिग्मी एजंट पिग्मी खातेदारचे पाच -सहा महिन्याची रक्क्म घेऊन पसार होतात. जेंव्हा खातेदारला माहित होते की बँक पिग्मी एजंट आपली रक्कम घेऊन पसार झाला ? खातेदार बँकेत येऊन विचारणा केली असता बँक कर्मचार्याकडून वरिष्ठा कडे तक्रार करा असं उत्तर दिल्या जाते व्यावसायिकांना आपल्या व्यवसाय करतांना कमी वेळ मिळतो, याचा फायदा घेत पतसंस्थेनी पूरेपूर दक्षता न घेतल्याने आर्थिक गैरव्यवहार व फसवणूक केल्याचे दिसते त्यांनी निवेदन मध्ये आरोप करत बँकेवर प्रश्न चिन्न करत म्हटले आहे की,बँक पिग्मी एजंट कडून बँक खातेदारचे खाते फॉर्म भरलेशिवाय खाता पुस्तकं देत नाही. तर मंग पिग्मी एजंट ने बँक चे पुस्तकं आणि शिक्के याचा कसा काय वापर करून आम्हाला बोगस बँकेचे सही शिक्का असलेले पुस्तकं वितरित केले ?हे बँक वाल्याला हे इतके दिवस का कळले नाही ?याच्या सोबत बँक मधले सहकारी सामील तर नाही ना ? की हे संगणमताने होत होते . हे राजलक्ष्मी क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा ढाणकी च्या नावाने बोगस पतसंस्था तर चालवत नाही ना ? याची सखोल चौकशी करून बँकेने आमची रक्कम परत करावी . नाही तर बँकेवर पोलीस कारवाई करून न्यालय लडाई लडू .असे निवेदन फकीर खाँ ह्यात खाँ, राकेश तुकाराम यमजलवार,सौ. रुकमीना अलकटवार, प्रवीण,बालाजी अलकटवार,आदेश चव्हाण आणि निरंजन नलगे यांनी बँक व्यवस्थापक धरणे यांना दिली
चौकट
आमच्या बँकेचे ऑडिट चालू आहे , यात किती लोकांचे विड्रॉल झाले आहे ते बघणे चालू आहे . ज्याच्या सोबत फसवणूक झाली त्यांची भरपाई करण्यासाठी आम्ही नियुक्त केलेले पिग्मी एजंट चे डिपॉजिट म्हणून ठेवलेली रक्कम व गॅरंटरकडून ती रक्कमभरपाई करून देऊ.
राजलक्ष्मी क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा ढाणकी (व्यवस्थापक-धरणे )
