सिंचनाकरिता पाणी द्या शेतकऱ्यांचे उपविभाग अभियंताला निवेदन व आंदोलनाचा इशारा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

बेंबळा कालवे विभागातून राळेगाव क्षेत्रातील खंड क्रमांक दोन क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामा करिता पाणी मिळत नसल्याने सिंचनाकरिता पाण्याची पाणी द्या याकरिता राळेगाव तील गरजू व सिंचनग्रस्त शेतकऱ्यांनी उपविभाग अभियंता बेंबळा पाटबंधारे विभाग राळेगाव राजेश हटवार व स्नेहल वसावे यांना लेखी निवेदन सादर केले संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातून पंधरा वर्षांपूर्वीच बेंबळा कालवे प्रकल्पाचे कामे झाली शेतकऱ्यांच्या जमिनी देखील अधिग्रहित केल्या तेव्हापासून शेतकऱ्यांना सिंचनाकरता एकही थेंब पाणी मिळाले नाही, तर बेंबळा कालवे विभाग यवतमाळ यांच्या अधिनस्त असलेल्या राळेगाव वितरिकेच्या कालवा पात्रात मागील बांधकाम हंगामात केलेले लाइनिंग ची कामे सुरळीत असून त्यातून सिंचन प्रवाह सुरळीत होतो परंतु राळेगाव डी वाय वितरिकीच्या एल 1 लघुपाठातून सिंचन करण्यासाठी पाणी प्रवाह सुरू केल्यास त्यावरील अवलंबून असलेल्या दोन्ही बाजूच्या शेतात पाण्याचा प्रवाह अस्ताव्यस्त शिरून शेतातील पिकांचे नुकसान होते सदर एल 1 लघुपाटाचे कालवा पात्रात अवास्तव वाढलेली झाडे व झुडुपी अति प्रमाणात वाढल्यामुळे जागोजागी पाण्याचा प्रवाह खंडित होतो त्यामुळे एल 1 लघुपाठातील सर्व झाडीझुडपे तात्काळ काढून देण्याची आवश्यकता आहे मागील बांधकाम हंगामात काही ठिकाणी लिंकिंगची कामे झाली तीन ठिकाणी तीस मीटरची कामे झाली परंतु संपूर्ण लांबीत स्वच्छता व झाडी झुडपांची अडथळे काढून लघुपाटातून सुरळीत सिंचन व्यवस्था होईल अशी शासनाने व्यवस्था करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे वाढलेली झाडे झुडपे तोडून व काही ठिकाणी सिमेंट ची कामे केल्यास हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांनी याकरिता लेखी निवेदन दिले आहे संबंधित कामे तात्काळ न केल्यास गरजू शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गट तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके बांधकाम सभापती मंगेश राऊत शेतकरी प्रथमेश ढोरे,गजानन महाजन, चंद्रकांत केवटे, पुरुषोत्तम पिंपरे ,मनोज बोथरा, मोहन पावडे, विठ्ठल भावे ,किशोर दिंडेकर यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.