
वरोरा: नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात अरविंद विद्या निकेतनचा उत्कृष्ट निकाल लागला असून त्यामध्ये प्रथम जान्हवी तडस हिला ९२.२० टक्के, व्दितीय समृद्धी ताजणे ९१.४० टक्के, तृतीय सायमा शेख ८७.४० टक्के घेऊन यांनी सुयश कमावले आहे.याव्यतिरीक्त इतर पाच विद्यार्थ्यांनी ८५ टक्के च्या वर गुण प्राप्त केले असून उर्वरित विद्यार्थ्यांनी ७५ टक्के गुण प्राप्त करून विद्यालयाचा १०० टक्के निकाल लावलेला आहे.त्याबद्दल
संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान सर, सचिव अमन टेमुर्डे, कोषाध्यक्ष अभिजित बोथले, सदस्या सौ . माया ताई राजुरकर मॅडम यांच्या सह मार्गदर्शनात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गुरूदेव जुमडे, तसेच शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
