
सहसंपादक : रामभाऊ भोयर
रेसिंग डे सप्ताह निमित्ताने आज रोजी पोलिस स्टेशन राळेगाव तर्फे वाहनचालकाची जनजागृती करण्याकरिता आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात आली. जे वाहनचालक नियमांचे पालन करीत प्रवास करत होते त्यांना आज पोलिसांतर्फे गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जे लोक विना हेल्मेट, ट्रिपल सीट असे वाहन चालवत होते त्यांना “यमदूत” तर्फे गुलाबपुष्प देऊन उपरोधिक रित्या सत्कार करण्यात आला. राळेगाव शहरात आज शुक्रवार रोजी बाजार निमित्ताने लोकांच्या गर्दी चा ठिकाणी, डॉ आंबेडकर चौक, बस स्टँड, रावेरी पॉइंट अशा विविध ठिकाणी यमदूत पाहून जमलेल्या लोकांना पोलिसांतर्फे वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्या संदर्भाने आवाहन करण्यात आले.
माहितीस्तव सविनय सादर आहे.
