

सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील खूल्या जागेवर असलेल्या ओम साई मंदिराचा ६वा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात येथ आहे यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यात दिनांक ६ फेब्रुवारीला सकाळी ५ वाजता साई बाबांचा अभिषेक व स्थापना पुजन, हवन व सायंकाळी ६वाजता ओमसाई कलामंच हिंगणघाट यांचा संगीतमय भजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असुन ७ तारखेला सकाळी आठ वाजता ओम साई मंदिर, काळे ले आऊट, गणेश नगर येथुन साईबाबांची पालखी व दिंडीचे आयोजन करण्यात आले असुन त्यातच दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन या सर्व ओम साई मंदिराचा वर्धापदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला तालुक्यातील व शहरातील भाविक भक्तांनी उपस्थिती रहावे असे आवाहन साईभक्त सुरेशसिह गहरवाल व साई मंदिराचे सर्व संचालक व काळे ले आऊट गणेश नगर येथील नागरीक यांनी केले आहे.
