
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कापसाच्या दरात सातत्याने घसरण
होत असून हे दर आता हमीभावाच्या खाली आले आहेत गेल्या तीन वर्षाची आकडेवारी बघितल्यास हे दर तीन वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहे. दोन वर्षाच्या अगोदर कापसाचे दर हे 14 हजार रुपये क्विंटलवरती गेले होते मागील वर्षी सुद्धा कापसाच्या दराची सुरुवात ही नऊ हजार रुपये क्विंटल ने झाली होती पण या वर्षी मात्र हमीभावाच्या म्हणजेच 7000रुपयाच्या दरम्यान कापसाची खरेदी विक्री सुरू होती पण आता त्यात सातत्याने घसरण होत असून हे दर केवळ सहा हजार ते 6700 रुपयाचे दरम्यान आले आहेत हे दर निश्चितच तीन वर्षाच्या नीचांकी पातळीवरती आहेत यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून भविष्यात कापसाच्या पेऱ्यावरतीच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहेत. कापसाचे दर किमान दहा हजार रुपये पाहिजे तरच शेतकऱ्याला कापसाचे उत्पादन परवडते कारण एकीकडे खत कीटकनाशके बी बियाणे व मजुरीचा वाढलेला खर्च निसर्गाचा लहरीपणा व दुसरीकडे कापसाचे होत असलेले उत्पादन याचा हिशोब काढल्यास कापसाचे दर हे दहा हजार रुपये पाहिजे पण एकीकडे उत्पादन हे सातत्याने कमी होत आहे व दुसरीकडे भावही कमी होत आहेत यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुरता हवालदील झाला आहेत. कापसाच्या आयातीमुळे कापसाच्या भावामध्ये सातत्याने घसरण होत आहेत कापसाचे भाव कमी होण्यामागे अनेक कारणे असले तरी यामध्ये कापसाची सातत्याने होत असलेलीआयात हे एक महत्त्वाचे कारण आहेत . देशात सध्या प्रतिदिन सव्वा दोन लाख कापूसगाठीची आयात होत आहेत . तसेच दररोज दहा लाख क्विंटल सरकीची सुद्धा आयात होत आहेत तेलाची आयात ही सुरूच आहे आयात अशीच सुरू राहिल्यास कापसाचे भाव कसे वाढणार कारण व्यापाऱ्यांना कमी दरात चांगला कापूस विदेशातून मिळत आहेत मग व्यापारी स्थानिकचा कापूस चढ्या भावात कशाला घेतील मागील काही दिवसांमध्ये रुईच्या किंवा कापूस गाठीच्या दरात घसरण होत होती ती अलीकडच्या काळात थांबली आहे सरकीच्या दरात काही प्रमाणात घसरण आहे पण यामुळे कापसाचे दर इतके खाली येण्याचे कारण नव्हते देशात सातत्याने कापसाची आयात सुरू असल्याने कापसाला भाव मिळत नाही हे वास्तव मात्र सर्वांना मान्य करावे लागेल.
