हास्याच्या कारंज्यात खदखद मास्तरांचा व्यवस्थेवर प्रहार, वडकीत प्रा.कराळे यांनी उडविले मार्मिक प्रतिबिंबाचे फवारे

सहसंपादक: रामभाऊ भोयर

समाजपयोगी व उच्चपदस्था पर्यंत पोहचण्यासाठी नियमित अभ्यासाचा चढता आलेख व्यक्तिमत्व घडविण्याची फलश्रुती ठरते.त्यासाठी दिलखुलासपणे समोर जाण्यासाठी मनाचा ठाव गरजेचा आहे.अलीकडच्या असहमतीच्या व्यवस्थेवर आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेत सामाजिक , राजकीय , आर्थिक , महागाई , बेरोजगारीवर प्रहार करीत भरगच्च व्याख्यान कार्यक्रमात मार्मिकतेने भाष्य करीत खदखद मास्तर प्रा.नितेश कराळे सरांनी हास्याचे फवारे उडवित स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ते वडकी येथील येथील दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कोकाटे मंगल कार्यालयात संभाजी ब्रिगेड शाखा वडकी यांच्या संयुक्त विद्यमाने भीमा कोरेगाव दिन,राजमाता जिजाऊ जन्मोत्सव,सावित्रीबाई फुले जयंती,छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.नितेश कराळे सर बोलत होते.मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे हे होते.उद्घाटक पोलीस उपनिरीक्षक जाधव,प्रमुख वक्ता साहित्यिक विचारवंच विश्वजीत कांबळे,राजेंद्र राजदीप,प्रमुख पाहुणे सरपंच शैलेश बेलेकर,सामाजिक कार्यकर्ता रमेश कंनाके,नरेंद्र पोयाम,प्रमुख उपस्थिती माजी सरपंच डॉ नरेंद्र इंगोले,डॉ देविदास तेलतुंबडे,डॉ प्रेमदास कांबळे,रसुलभाई शेख,सागर इंगोले,मौलाना नदीमखान,मनोज भोयर,अंकुश मुनेश्वर,मकबूल शेख,लहुजी जीवतोडे,चंद्रशेखर कोवे,अरुण फुटाणे,पत्रकार अमोल सांगानी यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.कराळे यांनी आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून उपस्थित हजारो महिला नागरिक तथा जनसमुदायास वर्तमान परिस्थितीच्या वेगवेगळ्या पैलूवर भाष्य करीत गंभीरतेने व विनोदाने उपस्थितांचे मने जिंकली.विद्यार्थी दशेपासून उच्चपदस्थ समाजपयोगी माणूस घडविण्यासाठी नियमित अभ्यासाची जोड प्रतिपादित करीत प्रा.कराळे यांनी वाढत्या महागाईचा आलेख ,बेरोजगारी , भरकटत असलेला विद्यार्थी , शेतकरी आत्महत्या या गंभीर बाबीवर चिंता व्यक्त करीत कार्यक्रमात विनोदाचे फवारे उडवित अभ्यासक्रम , मुळाक्षरे , व्यंजने आदींवर अभ्यासपूर्ण विवेचन करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनातील खदखद दूर करीत आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीची चुणूक दाखवीत उपस्थितांच्या मनावर भुरळ पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा राजदिप यांनी प्रास्थविक ज्योती शामकुवर तर आभार प्रदर्शन अजय ठमके यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शाहरुख शेख, जगदीश गोबाडे,अजय ठमके, प्रवीण बेलेकर,योगेश तेलतुंबडे, अब्दुल सादिक शेख,प्रमोद बोंबले,सनी ठमके,शिवम वाघाडे,समीर सातघरे,पराग काकडे,प्रज्वल गोटे नागेश तोडासे,राहुल शेटे,प्रशांत सातघरे,यांनी अथक परिश्रम घेतले.