
बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी//शेख रमजान
गांजेगाव पैंनगंगा नदी पात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखा यांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी विजय बबन भोरखडे राणा टेभूर्दरा ता. उमरखेड जि. यवतमाळ ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सध्या वाळू लिलाव झालेले नाही व शासनाने रेती कायदा सुद्धा चालू केला नाही . याचा फायदा घेत रेती माफिया तालुक्यातील पैंनगंगा नदी पात्रातून वाळूची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, यांनी निवेदना व साखळी उपोषण द्वारे तालुका उपविभाग अधिकारी व तसीलदार यांना निर्देशनात आणून दिले त्या अनुसंगाने प्रशासनाने त्यावर पथक नेमून कारवाईबाबत सूचित केले.
त्यानुसार सोमवार(ता.19) रात्री 12.20वाजेच्या सुमारास स्था.गु.शा. पथकाने गोपनीय माहिती वरून गांजेगाव ते ढाणकी रोड वरून जात असताना ट्रॅक्टर ची तपासणी केली असता ट्रॅक्टर चा चालक यांनी शासनाची कोणत्याही प्रकारची राॅयल्टी न भरता ट्रॅक्टर मधे रेती चोरुन नेत असतांना . 9500 MASSEY FERGUSOM कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH-29-BP-7607 व विना क्रमांकाची ट्राॅली किं.अं. 5,00,000/- रु,
2) एक ब्रास रेती कि.अं. 6000/- रु एकुण 5,06,000/- रु चा मुद्देमाल स्थानिक .गुन्हे .शाखा यांनी जप्त केला आहे. याबाबत कुणाल अशोकराव मुंडोकार स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी फिर्याद दिली. पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरिता पो.स्टे. बिटरगाव यांच्या ताब्यात देण्यात आले.
