

सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे दि.25 फेब्रु.2024 ला तिरळे कुणबी समाज उपवर -वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. भानुदासजी कोकाटे मंगल कार्यालय येथे स.10 वा पासून या परिचय मेळाव्यास सुरुवात होईल.समाज बांधवानी सामाजिक जबाबदारी समजून मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन राळेगाव तालुका तिरळे कुणबी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
परिचय मेळाव्याचा उदघाट्न सोहळा स.10 वा. सुरु होईल. यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे तर उदघाटक म्हणून माजी मंत्री माणिकराव ठाकरे उपस्थित असतील. प्रमुख अतिथी म्हणून विलासराव भोयर माजी संचालक य. म. स. बँक, ऍड. प्रफुल्लभाऊ मानकर जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी,नरेंद्र पाटील ठाकरे माजी उपाध्यक्ष जि. प. यवतमाळ,मनिष पाटील अध्यक्ष य. म. स. बँक,वसंतराव घुईखेडकर अध्यक्ष महा.हाऊसिंग कार्पो. मुंबई,प्रकाशराव मानकर संचालक य. म स. बँक,अमनराव गावंडे माजी अध्यक्ष य. म. स. बँक,सुरेशराव गुडधे संस्थापक अध्यक्ष तिरळे कुणबी समाज संघटना,जानराव पाटील केदार अध्यक्ष तिरळे कुणबी समाज संघटना नागपूर,उषाताई बाबाराव भोयर माजी जि. प. सदस्या,प्राजक्ताताई प्रवीण कोकाटे संचालक कृ. उ. बा. स. राळेगाव,प्रीतीताई संजय काकडे,माजी नगरसेविका कीर्तीताई राऊत आदी उपस्थित असतील. परिचय मेळाव्यात पसंती झाल्यास बोलणी, बैठक आदी करीता रूम उपलब्ध असेल. सर्व उपस्थित समाज बांधव भगिनीं करीता भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कृषी व्यवसायाशी नाळ जुळलेला तिरळे कुणबी हा गावाचे वैभव होता.अनेकांच्या मदतीला धावून जाणारा हा समाज न्यायप्रिय, कर्तव्यनिष्ठ, नेतृत्वक्षमता अंगी असणारा व दिलेला शब्द पाळणारा म्हणून ओळखला जातो.कृषीक्षेत्राची दुरावस्था झाल्याने तिरळे कुणबी समाजाची आर्थिक स्थिती बिघडली.पिढ्यानंपिढ्या दा्तृत्व अंगीकारलेले समाज बांधव दुसऱ्यापुढे हात पसरायला धजले नाही. आणि अनेक प्रश्न या समाजासमोर निर्माण झाले. या सर्व स्थितीचा विचार करून समाजाचे एक मजबूत संघटन निर्माण व्हावे,तरुणांना एक दिशा मिळावी.समाजातील उपवर -उपवधू यांचा परिचय व्हावा, वेळ व पैशाची बचत व्हावी या उदात्त हेतूने या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाज बांधवानी आपली जबाबदारी समजून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे. बहुसंख्य समाज बांधव भगिनीं यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राळेगाव तालुका तिरळे कुणबी समाज संघटना यांचे वतीने करण्यात आले आहे.
