
सहसंपादक : रामभाऊ भोयर
– ग्राम स्वराज्य महामंच ही सामाजिक चळवळ आहे नुकताच राष्ट्रसंत मानिक रत्न पुरस्कार सोहळा पार पडला.तोच नविन सामाजिक कार्यक्रम आमच्या कडे आला.एक आई माझ्याकडे आली आणि म्हणाली माझा मुलगा एमसीए झाला आणि तो पुण्यात आहे त्याचा जन्म दिवस मला करायचा आहे.मी ठी आहे म्हटले, आणि कार्यक्रमाचे आयोजन आम्ही वाघाडी येथे “आम्ही साऱ्या सावित्री “‘ फासे पारधी मुलींच्या वसतिगृहात आयोजित केला कार्यक्रम चे निमंत्रक मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांच्या कल्पनेतून उपस्थित मान्यवर व्यक्ती आमंत्रित मा गोविंद चव्हाण सेवा निवृत्त अधिकारी उपस्थित होते सोबत मा उत्तमराव खंदारे भारत जोडो अभियान डॉ विठ्ठल चव्हाण, प्रल्हाद काळे, उपस्थित होते आणि ज्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आम्ही सर्व जमलो तो मात्र पुण्यात होता ची.ऋषिकेष सुधिर गुल्हाने – परिवारातील आजोबा चंपतरा हिंगासपुरे आजी कुसुम हिंगासपुरे मा जितेंद्र हिंगासपुरे मामी रजनी हिंगासपुरे कु रशिका आणि खुशबू हिंगासपुरे आणि किशोर भाउ गिरी आणि ऋषीकेश ची आई सौ वनिता गुल्हाने यांनी केक कापून सर्व वस्तीगृहाच्या च्या मुलींना तोंडी भरवला ही खरी लेकरांची माया आणि आपलुकी सौ वनिता गुल्हाने ( हिंगासपुरे ) यांनी दाखवून दिले ही खरी माणुसकी आहे आपला मुलगा पुण्यात असताना त्याचा जन्म दिवस गरीब होतकरू मुलींसाठी स्वादिष्ट भोजन देऊन एक घड्याळ भेट देऊन आणि ऋषीकेश ची आठवण म्हणून एक झाडं लावुन “‘ आम्ही साऱ्या सावित्री”‘ या ठिकाणी केला ही माणुसकी आहे हे वस्तीगृह चालविणारे सौ पपिता इश्यू माळवे आणि इश्यू माळवे ही लोकांच्या देणगी तुन २० मुलींचा सांभाळ करत आहे शासनाचे कसले ही अनुदान नाही यांनी सर्व सहभागी लोकांचे आभार मानले
