वरूड जहांगीरच्या जंगलातील हेटी शिवारात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार, शेतकऱ्यांत भितीचे वातावरण

                                  राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 

राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर या गावाला लागूनच ज़ंगल आहे.त्यामुळे वरूड येथील जनावरांना चरण्यासाठी या जंगलाच्या दिशेने गुराख्यांना न्यावे लागते. अशातच मागील काही वर्षांपूर्वी वरूड बोराटी जंगलात अवनी वाघीनीने धुमाकूळ घालून अनेक नरबळी घेऊन परिसरात हांहाकार माजवला होता.यामुळे या परिसरातील अनेक गावांतील गावकरी,शेती करणारे शेतकरी, शेतात काम करणाऱ्या महिला यांना एक प्रकारची भिती निर्माण झाली होती.अशातच शासनाने शर्तिचे प्रयत्न करून अवनीचा बंदोबस्त केल्यानंतर लोकांनी मनमोकळेपणाने जिवन जगणे सुरू केले असतांनाच वरूडवरून मोहदा जाणारा रस्ता परत सुरू झाला होता. अशातच काही वर्षांपूर्वी वरूड जहांगीर येथील रहिवासी तुळशीराम वडते सपत्नीक आपल्या मोटरसायकलने येत असताना वाघढोडा नाल्यात वाघाचे दर्शन झाले होते पण कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यांनतर काही वर्षे लोटली तर अशातच मागील काही दिवसांनीं बोराटीच्या अलिकडे जंगलात लागून असलेल्या नाल्याजवळ परत डोंगरखर्डा येथील चरायला आलेल्या गाईची शिकार करून वाघोबांनी आपली दहशत निर्माण केली. या सर्व बाबींची माहिती वनविभागाला देऊन मदतीची याचना करत असतांनाच आज दिनांक 23/4/2024 रोजी दुपारी तीन ते चार वाजता दरम्यान वरूड जहांगीरला लागून असलेल्या बुकई शिवारातील हेटी परिसरात कळपातील गोरा जातीचे जनावराची शिकार करून विस ते पंचवीस हजार रूपयांची हानी केली असून हा गोरा वरूड जहांगीर येथील शेतमजूर शंकर चिंधू ठाकरे यांच्या मालकीचा असून ताबडतोब चौकशी करून कारवाई करण्यात यावी आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाघाच्या चर्चेला पूर्णविराम देण्यात यावा अशी मागणी वरूड जहांगीर व परिसरातील नागरिकांनी केली आहे.