राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या डेली निडस च्या दुकानात सिलेंडरचा भयानक स्फोट , मॉर्निंग ग्रुप कडून आर्थिक मदत

सहसंपादक : रामभाऊ भोयर

साधारणता चार पाच दिवसापूर्वी राळेगाव शहरात ग्रामीण रुग्णालया च्या बाजूला असलेल्या डेलीनिडस च्या दुकानात सिलेंडर चा भयंकर स्फ़ोट होऊन आग लागून संपूर्ण दुकान बेचिराख झाले. दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आणी त्याच आगीत उमेश उईके या दिव्यांग युवकाचे स्वप्न ही खाक झाले.
घरी अठराविश्व दारिद्र आधीच बेताची परिस्थिती त्यात बेसिक चे कर्ज काढून कशीतरी चहा ची टपरी सूरू केली उमेश च्या जिद्दीने आणी मेहनतीने व्यवसाय चांगला भरभराटीस आला मग उधारी वर जुना फ्रिजर घेऊन कोल्ड्रिंक सुरु केल. मात्र नियती ला काही वेगळंच मान्य होत अवघ्या काही वेळा पूर्वी उमेश दुकान बंद करून जातो आनि त्याचे दुकानातं भयंकर स्फ़ोट होऊन काही मिनिटात दुकान आगीच्या भक्षस्तानी पडते आणी दुकान बेचीराख होते आता उरते फक्त उमेश च्या स्वप्नाची राख.
मात्र अजूनही उमेश ने जिद सोडली नसून पुन्हा नव्या उमेदीने उभ राहण्याच स्वप्न बघितलआहे आणी त्याच्या या स्वप्नांना पंख दिले ते राळेगाव येथील मॉर्निंग पार्क ग्रुप च्या सदस्यांनी. मॉर्निंग पार्क ग्रुप नेहमी सामाजिक कार्यात अग्रसर राहणारा एक समूह. आपण समाजात राहतो आणी आपलही समाजाला काही देण लागत हाच विचार घेऊन चालणाऱ्या ग्रुप च्या लक्षात ही गोष्ट येताच सदस्यांनी सढळ हस्ते मदत करून आपल्या ग्रुप कडून उमेश ला परत व्यवसाय उभा करण्याकरीता 32100/ रुपयाचा निधी उमेश च्या स्वाधीन केला तसेच त्याच्या व्यवसायाकरिता लागणारे साहित्य ही बघण्याचे ठरले.इतरांनी ही मॉर्निंग पार्क ग्रुप चा आदर्श घेऊन उमेश वर आलेल्या संकटात आपल्या कडून होईल ती मदत करावी हिच अपेक्षा