
सहसंपादक : रामभाऊ भोयर
लोकसभा निवडणूक पार पडला नंतर तीन ते चार महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका करिता गणित मांडण्यास सुरवात झाली असून राळेगाव विधानसभा मतदार संघमध्ये निवडणुकीचे राजकीय वारे वाहू लागली आहे, विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन आहे, त्याचाच इच्छुक उमेदवारांची नावाची चर्चा राळेगाव मतदार संघात आपल्याला होताना दिसत आहे, यावेळी कोलाम समाजातील तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून राळेगाव मतदार संघात मा. सुभाष भाऊ कासार यांचे नाव खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, सुभाष भाऊ कासार राळेगाव मतदार संघात अनेक दिवसापासून कामे चालू आहे. त्यांच्या माध्यमातून गरीब मुला-मुलींचे लग्न, आरोग्य सेवेसाठी मदत, शिक्षणासाठी मदत, विधवा महिलांना आधार, तरुण युवकांना रोजगार संधी मिळावी यासाठी प्रयत्न, आदिवासी समाजावर होणारे अन्यायाविरुद्ध लढा, अतिक्रमण धारक शेतकऱ्यांसाठी तहसील जिल्हाधिकारी कार्यालय अनेक निवेदन, गाव, पोड, वस्तीमध्ये पाण्याची सोयीसाठी प्रयत्न, आदिवासी समाजासाठी अनेक असंख्य प्रश्न सुभाष भाऊ कासार यांच्या माध्यमातून कार्य चालू आहे.
आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते अतुल भाऊ आत्राम, भीमराव आत्राम, संदीप भाऊ कोवे, सुधाकर भाऊ चांदेकर, लक्ष्मण भाऊ अस्वले, ज्ञानेश्वर कासारकर, अंकुश भाऊ कासारकर, राहुल भाऊ चिचघाटे, प्रकाश भाऊ सुरपाम, असे असंख्य कार्यकर्ते भाऊला साथ देण्यासाठी आणि विजयाची मशाल राळेगाव मतदार संघात पेटवण्यासाठी तयारीत आहे..
