नवनिर्वाचित 11 वि.प. सदस्यांत सर्वाधीक प्रगल्भ भावनाताई गवळी पाटील

सहसंपादक : रामभाऊ भोयर

नवनिर्वाचित 11 विधान परिषद सदस्यांत सर्वात प्रगल्भ व प्रदीर्घ राजकीय अनुभवी वाशिमच्या पाच वेळा अपराजीत खासदार पद भूषविलेल्या ताईसाहेब उर्फ भावना गवळी असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. ताईसाहेबांचे सलग 25 वर्षे लोकसभा कामकाजाचे अनुभवाचा फायदा आता महाराष्ट्राचे विधान परिषद सभागृहाला निश्चितच होईल असा आशावाद जनतेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थित शिवसेना पक्षाकडून भावना गवळी व कृपाल तुमाने हे दोघे माजी खासदार महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर निवडले गेले आहेत. शिवसेना याच पक्षातर्फे स्व कर्तुत्वावर वडिलांची दोन अडीच खासदारकी वगळता कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना 1999, 2004, 2009, 2014, आणि 2019 अशी सलग पाच वेळा एकाच लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडूनच महिला खासदार होणाऱ्या ताईसाहेब भावना गवळी ह्या नवनिर्वाचित अकरा विधान परिषद सदस्यांमध्ये तब्बल 25 वर्षाचा लोकसभेतील कामकाजाचा अनुभव असलेल्या आणि कोणतेही मंत्रीपद नसतानाही केवळ खासदार पदावर आपल्या मतदारसंघात प्रत्येक वेळी आपल्या मतदानाचा आलेख उंचावणाऱ्या अपराजित खासदार भावना गवळी या नवनिर्वाचित विधानपरिषदेच्या सदस्य मध्ये सर्वाधिक प्रदीर्घ सभागृहाच्या कामकाजाच्या अनुभवी विधान परिषद सदस्य असाव्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थित शिवसेना पक्षाचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने हे सुद्धा दोन वेळा खासदार राहिलेले आहेत 2009 ला ते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तत्पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नवनिर्वाचित वी. प. सदस्यात कृपाल तुमाने भावना गवळी प्रमाणेच लोकसभेची संधी न दिल्याने ज्यांना विधान परिषदेची संधी दिली असे परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर होत तसेच उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी, या पदावरून सेवानिवृत्त झालेले शिवाजीराव गर्जे यांनी 2009ला विधानसभेची निवडणूक लढली होती मात्र तेथे पराभूत झाले होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते आलेत. हे दोघेही प्रथमच विधान परिषदेत जात आहेत. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव ह्यांच्या पत्नी प्रज्ञा राजीव सातव यांना पुनश्च दुसऱ्या वेळी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेची संधी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांमध्ये पंकजा मुंढे या 2009 व 2014 ला विधानसभा आमदार झाल्यात. त्यांना महिला व बालकल्याण आणि जलसंवर्धन खात्याचे मंत्री पदाची संधी मिळाली अशाप्रकारे दहा वर्षाची सभागृहाची कारकीर्द आहे. नागपुरचे डॉक्टर परिणय फुके हे पुनश्च विधान परिषद सदस्य झालेत तसेच दुसऱ्यांदा सदाभाऊ खोत हे विधान परिषदेत गेलेत. माजी आमदार योगेश टिळेकर हे 2014 ला हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर पिंपरी चिंचवडचे अमित गोरखे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पद भूषविले होते त्यांना यावेळी विधान परिषदेची संधी दिली आहे अशाप्रकारे भारतीय जनता पार्टीचे पाच नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आहेत.

ढोबळ मानाने या नवनिर्वाचित अकरा विधान परिषद सदस्यांची राजकीय कारकीर्द बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थित शिवसेनेच्या विधान परिषद सदस्या पाच वेळा अपराजीत खासदार राहिलेल्या भावना गवळी ह्या सर्वात प्रगल्भ व प्रदीर्घ सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या सदस्य आहेत. लोकसभेत पंचवीस वर्षे सभागृह गाजविलेल्या व अनेक लोकाभिमुख निर्णय केंद्र सरकारला घेण्यात लावणाऱ्या भावनाताई गवळी यांचा विधान परिषदेतील कामकाजाच्या अनुभवाचा निश्चितच राज्याला फायदा होईल असे राजकीय वर्तुळातून बोलले जाऊ लागले आहे.