
प्रतिनिधी अरुण देशमुख यवतमाळ
आज आषाढ पौर्णिमा
तसेच सर्वांची इष्टदेवता म्हणजेच गुरुपौर्णिमा आजच्या दिवशी सर्व मानवधर्मांनी गुरु केला आहे. प्रथमता आपले आई-वडील हे गुरु आपल्या शाळेत शिकवणारे दुसरे गुरु. आपली बुद्धी विकसित करणारे व आपल्याला ज्ञान मिळवून देणारे सर्व संतांची साहित्य हे पण आपले गुरु मानव हा प्रत्येक आपापल्या परीने गुरु करीत असतो संत असो थोर पुरुष असो इष्टदेवता असो त्यांना सर्वांना आपण आपल्या गुरुस्थानी समजलं पाहिजे आपला महाराष्ट्र हा सर्व संतांनी व्यापलेला महाराष्ट्र आहे यात काही थोर पुरुष होऊन गेले उदाहरणार्थ शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे मानवांना किंवा विद्यार्थ्यांना शिकवण देणारे साने गुरुजी महर्षी शाहू महाराज. संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज. चोखामेळा एकनाथ महाराजअसे अनेक संत थोर आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले. यातलेच संत कर्मवीर गाडगे महाराज तसेच आपल्या साहित्यातून आणि भजनातून प्रबोधन करणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ह्या महाराष्ट्र भूमीला लाभले याच अनुषंगाने आज गुरुपौर्णिमेच् अवचित साधून मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी आर्णी रोड यवतमाळ . येथे गुरुदेव सेवा मंडळ यवतमाळ यांच्या वतीने तसेच भजन प्रभाव समिती मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी यवतमाळ यांच्या सहभागाने आज येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या खंजिरी भजनापासून सुरुवात करण्यात आला दुपारी चार वाजता. पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सामूहिक खंजिरी भजनाचा कार्यक्रम झाला या भजनाच्या कार्यक्रमाला हार्मोनियम ची साथ नामदेवराव राजुरकर अशोकराव गेडाम त्यांनी केली तसेच तबल्याची साथ अतुल तातावर व डॉक्टर प्राध्यापक अनंत कुमार सूर्यकार सर यांनी केली त्यानंतर. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना. झाली प्रार्थना आटोपल्यानंतर मान्यवरांची काही भाषणे झाली त्यानंतर गुरुचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला मानवता मंदिर शिवनेरी सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश जयस्वाल उपाध्यक्ष संजू भाऊ भुयार सचिव.विजय इंगोले कोषाध्यक्ष डॉक्टर पुंसे तसेच भजन प्रभाव समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक अनंत कुमार सूर्यकार उपाध्यक्ष बजरंग शेंडे सचिव रामदासजी घंगाळे कोषाध्यक्ष तुकाराम जी राऊत. नारनवरे. जोगदंड. बावणे व महिला मंडळी किर्तन ताई खाडे ताई बोदडे ताई हे या कार्यक्रमाला हजर होते व बाकी मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते यात प्रामुख्याने मान्यवर राष्ट्रसंत विचारमंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख हे सुद्धा या कार्यक्रमाला हजर होते भजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सामुदायिक प्रार्थना झाली सामुदायिक प्रार्थना नंतर गुरुचे पूजन झाले. त्यानंतर आरती झाली आरती नंतर
राष्ट्रवंदना घेण्यात आली व नंतर गुरुदेवांचा त्रिवार जयघोष झाला. व प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जय गुरुदेव
