
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथे दिनांक 21 जुलै रोजी गुरू पौर्णिमेच्या मुहुर्तावर राळेगाव तालुक्यातील गणित शिक्षकांच्या सह विचार सभेत तालुका गणित अध्यापक मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली. या सभेच्या अध्यक्ष स्थानी यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष विनोद संगीतराव, प्रमुख अतिथी म्हणुन यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे माजी सचिव विजय विसपुते,सतीश काळे, जिल्हा कोषाध्यक्ष युवराज गेडाम, प्रमोद भेंडे, भास्कर ईटेकर, मेंडोले, कु. भारती ताठे, टी.पी.पिसे, न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा.जितेंद्र जवादे, पर्यवेक्षक सुरेश कोवे,अरुण कामनापुरे हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्यावत ठेवणे, त्यांचे संबोध स्पष्ट करणे, त्यांच्यातील गणिताची भीती दूर करण्यासाठी गणित शिक्षकांनी सदैव तत्पर व उपक्रमशील राहणे गरजेचे असल्याचे मत विनोद संगीतराव यांनी व्यक्त केले. जिल्हा व राज्यपातळीवरून आयोजित करण्यात येणार्या विविध गणित परीक्षांचा लाभ विद्यार्थ्यांना करून देऊन त्यांच्यात गणिताविषयी आत्मविश्वास वाढवला पाहिजे असे मत विजय विसपुते यांनी मांडले. अध्ययन- अध्यापना मध्ये विद्यार्थी सहभाग वाढविला पाहिजे असे मत सतीश काळे यांनी मांडले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृतीद्वारे शिक्षण दिले पाहिजे व विविध शैक्षणिक साहित्यांचा वापर केला पाहिजे असे मत कु.भारती ताठे यांनी मांडले. भास्कर ईटेकर,प्रमोद भेंडे, टी.पी.पिसे यांनीही आपली मते मांडली. सभेमध्ये राळेगाव तालुका गणित अध्यापक मंडळाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. राळेगाव तालुका अध्यक्ष गजानन टाले, उपाध्यक्ष देवेंद्र मून,विनोद सातारकर, सचिव विलास कुबडे, अमोल शेरकी, सहसचिव किशोर उईके,सौरभ गावंडे, कोषाध्यक्ष विजय थुल,राहुल हिवरकर, प्रसिद्धी प्रमुख योगेश मिटकर, संघटक सचिन ढोके, सहसंघटक विशाल मस्के,सल्लागार सुरेंद्र ताठे, कु.भारती ताठे,टी. पी.पिसे,प्रमोद भेंडे, के.डि.पाल तर सदस्य म्हणून नितीन गवई,संदीप सुरपाम,सचिन दहीकर, अनिल धोबे, निलेश गोरे, सतीश सावंत,अरुण कामनापुरे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता राळेगाव तालुक्यातील गणित शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास कुबडे व आभार प्रदर्शन यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे सदस्य संजय चिरडे यांनी केले….
