
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ गेल्या आठवड्यापासून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच आज रविवार रोजी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यात संपूर्ण गावामध्ये पान्याने थैमान घातले आहे. यात काही गावाचा संपर्क सुद्धा तुटला आहे. नदि नाले फुल्ल भरून वाहत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे राळेगांव तालुक्यात झाले आहे. शेती खरडून गेली, उभे पिक हे जास्त पावसामुळे वाळत जात आहे. उसनवारीच्या पैशातून शेतीची मशागत केली आहे पण तोसुद्धा खर्च यावर्षी निघते कि नाही तर शेतकऱ्यांपुढे मोठं संकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. शासनाने ताबडतोब सरसकट प़चनामे करून शेतकऱ्यांना मदत घोषित करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होतांना दिसत आहे.
बाॅक्स
राळेगांव तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पिके खरडून गेली कृर्षीचा एकही अधिकारी तसेच कर्मचारी येऊन पिकाबद्दल माहिती देत नाही आहे. मागील वर्षी क्रषीच्या एका महिला कर्मचारी सावनेर येथे शेतीचे चुकीचे पंचनामे केले व आपल्या समाजाच्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देऊन आपल भल केल अस यावर्षी सुद्धा होनार का अशा कर्मचाऱ्याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.
अंकुश मुनेश्वर शेतकरी
वेडशी राळेगांव.
