
सहसंपादक : रामभाऊ भोयर
क्रांतीवीर श्यामा दादा कोलाम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने तेजनी येथे जाऊन समाजातील लोकांचे प्रबोधन, आणि सर्वांगीण विकासासाठी लोकं प्रतिनिधी काय प्रयत्न केले यांच्या कामाचा लेखाजोखा “‘ तेजनी ग्राम दरबार “‘ मध्ये घेऊन समाज प्रबोधन करण्यासाठी मा.मधुसुदन कोवे गुरुजी, अध्यक्ष,ग्राम स्वराज्य महामंच यांनी पुढाकार घेतला होता राळेगाव विधानसभा हा राखिव मतदार संघ असुन इथे लोकप्रतिनिधी आदिवासी आहे हे लोक प्रतिनिधी विकास कामांचा लेखाजोखा तर कधी सांगत नाही पण कधी पोडावर वाड्या वस्तीवर फीरुण सुध्दा पाहत नाही असे आम्हाला तेजनी पोडावर गेल्यावर कोलाम समुहातुन दिसुन आले होते आदिवासी समाजाला हे आजी माजी लोकप्रतिनिधी नको आहे असे धडधडीत लोक बोलायला लागले आम्हाला समाजाची कामं करणारा माणूस पाहिजे “‘हे मानसं फक्त मतदान मागाले येते”‘ मग यांचा पत्ता लागत नाही अशा प्रतिक्रिया आदिवासी समाजातील लोकांच्या दिसून येत आहे. अशी शासनकर्ती जमात राळेगाव विधानसभा क्षेत्रात दिसून येत असेल तर आमच्या आदिम जमातीच्या विकासासाठी जबाबदार कोण ? आजी आमदार की माजी आमदार ही फार क्लेश दायक बाब आहे असे आमच्या निदर्शनास दिसुन येत होते राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी आदिवासी समाजातील लोकांना कमजोर समजु नये अश्या लोकप्रतिनिधी चा लेखाजोखा घ्या फक्त शहरात बॅनर पोस्टर लावून शहर विदृप करु नका तर ह्यांच्या सोबत वाड्या वस्त्या वर पोडावर आणि बेड्या वर जरा जावुन प्रतिक्रिया घ्या आढावा घ्या म्हणजे कळेल आपण कीती कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आहो आदिवासी समाजातील प्राथमिक प्रश्न सुटले पाहिजेत आपण लक्ष द्या आदिवासी समाजातील लोकांच्या विकासा कडे नाहीतर या निवडणुकीत आपली जागा दाखवून देवु अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आज श्यामा दादा कोलाम यांच्या पुण्यतिथी च्या निमित्ताने तेजनी येथे ग्राम दरबार मध्ये दिसुन आली होती प्रामुख्याने या “ग्राम दरबार – समस्या आणि विकास”‘ या मध्ये प्रामुख्याने सहभागी मधुसूदन कोवे गुरुजी,मा बळवंतराव मडावी साहेब मा वसंतराव पाडसेकुन,कोलाम समाज साहित्यिक,मा रमेश खन्नी कोलाम समाज विचार मंच मा सुरेश कुमरे श्यामा दादा कोलाम ब्रिगेड आणि समस्त तेजनी च्या दोन ही पोडावरची महिला पुरुष समाज बांधव उपस्थित होते येवती
