
ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी
उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध पक्षांतर्गत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी बऱ्याच इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे. कुणी कुठे विविध प्रकारचे फलके लावून तर कुठे जनसंपर्क वाढवून, जाहिरात बाजीकरून,तर कोणी समाजसेवेकच्या नावाखाली दवाखान्याची उंबरठे झिजवून,कोणी निवेदन देऊन, असे अनेक प्रयत्न इच्छुक उमेदवाराचे चाललेले आहेत.त्यात माजी आमदार,कोणी इच्छुक उमेदवार असो ,जमेल त्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो बॅनरबाजी चालली आहे. जिथे जागा भेटेल तिथे उमेदवाराचे बॅनर मग कुठली भिंत असो, वा सार्वजनिक मुत्रीघर तिथे सुद्धा इच्छुक उमेदवाराचे बॅनर, त्यात बरीच आजी-माजी आमदार, तसेच इच्छुक उमेदवार माध्यमांच्या प्रतिनिधींना हाताशी धरून आपल्या प्रसिद्धीच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून मी किती उत्तम काम करत आहे. हे दाखवून देण्यात सुद्धा कमी पडलेला नाही. अनेक नेते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कोणी मनो मिलन, कुणी राजा, कुणी देव,कोणी भाऊक होत आहे,तर कोणी तिकीट मिळण्याच्या आधी मीच विजयी होणार व मलाच मलाच पक्षातर्फे तिकीट मिळणार अशी पताका फडकवत आहे.त्यातच इच्छुक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची सुद्धा आमचा नेता कसा श्रेष्ठ हे दाखवून देण्यामध्ये कार्यकर्ते कुठेच कमी पडलेले नाहीत . चौका चौकात गप्पा रंगल्या की, आमचा नेता कसा पॉवर फुल्ल आहे हे पटवून देताना काही ठिकाणी तर मित्रा मित्रातच शाब्दिक चकमक होऊन फुल टू धमाल पहावयास मिळत आहे. आजी, माजी आमदार, भावी आमदार सर्व नेते तिकीट मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. काही नेते पैशाचे आम्हीश दाखवून माध्यमांचे कार्यकर्त्याची खिसे गरम करून आपल्या नावाचा बोलबाला करत आहे. कार्यकर्ता सोशल मीडिया वर आपल्या नेत्याने कार्य केलेल्या कामाचा असा गाजावाजा होत आहे. जणू काही त्यांच्या नेत्यांनी हिमालय पर्वतच उचलून आणला. काम चार आण्याचे असेल तर, ते काम बारण्याचे कसे दाखवायचे ते कार्यकर्त्याकडून शिकून घ्यावे. त्यात एखाद्या वेळी आपल्या नेत्याच्या कामाची एखादी पोस्ट टाकल्यास दुसऱ्या नेत्याचा पाठीराखा ते कसे सहन करणार तुमच्या नेत्यापेक्षा आमचा नेता कसा सरस हे दाखवण्याच्या नादात अनेक वेळा सोशल मीडियावर सुद्धा वाद विवादाला वाच्या फुटत आहे. विधानसभेची अवघ्या काही महिन्यातच निवडणूक तारीख येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांमध्ये तिकीट मागण्यासाठी रस्सीखेच चालू आहे. अनेक इच्छुक उमेदवार मोठ्या नेत्याला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे देवाला साकडे घालतात त्याप्रमाणे मोठ्या नेत्याची पायमल्ली करत आहे. मोठ्या नेत्याचा वाढदिवस असल्यास वाढदिवसाच्या नेत्याला आवर्जून भेटी घाटी करून जवळीक करण्याचा प्रयत्न करीत आहे. लवकरच काही दिवसातच मात्र पक्षश्रेष्ठी आपापले उमेदवार जाहीर करणार आहेत. याकडे इच्छुक उमेदवारासह, कार्यकर्त्याचे व नागरिकांचे देखील तेवढेच लक्ष लागले आहे.
