
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शंखनाद करत राळेगाव शहरात आज दिनांक 12/08/2024 ला श्रावण मास निमित्य कावड़ यात्रेचे आयोजन करण्यात आले.त्यात ग्राम देवता आठवडी बाजारातील आई शितला मातेच्या मंदिरा पासुन सुरुवात करण्यात आली.आईच्या मंदिरातील विहीर पुजन करण्या आधी श्रावण मास निमित्त वृक्षारोपण नंतर विहिर पुजन तसेच ग्राम देवतेची आरतीचे मान राळेगाव शहराचे उपनिरीक्षक दिपकजी राणे ह्यांना देण्यात आला. तसेच राळेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक,भुपेंद्र भाई कारीया,सुरेश गहरवाल,श्री.मेश्राम गुरुजी, माजीतहसीलदार गेडाम साहेब, राजजी वर्मा, योगेश इंगोले इतर… महिला वर्ग ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सौ.मधुताई कारीया,सौ.सुरजताई वर्मा,श्रीमती मधुताई वर्मा, सौ.संजिवनीताई गुल्हाने, ठुने ताई, सौ.वनिताताई पातकमवार इतर महादेव भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कावड़ यात्रेत भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि मान्यवरांच्या हस्ते जलभिषेक करण्यात आला. मेन रोड़ वरिल सर्व महादेव मंदिरामध्ये जलाभिषेक करण्यात आला.क्रांती चौकात श्री.रमेश सोनी यांच्या तर्फे शरबत वितरण करण्यात आले. या कावड़ यात्रेचे वैशिष्ट्य असे होते कि महादेवाच्या मंदिराच्या गर्भगृहा पर्यंत एक पाईप लावुन त्या पाईप मधुन भाविकांनी आणलेले गंगाजल व पुजेचे साहित्य टाकायचे आणि ते सरळ महादेवाच्या पिंडीवर पड़त होते. गर्दी न करता शांततेत कावड़ यात्रा पार पड़ली. तसेच या कावड़ यात्रेच्या समारोप श्रीराम मंदिर येथील महादेवाची विधीवत पुजा व अभिषेक आरती करुन करण्यात आली.
श्रीराम मंदिरा तर्फे अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिराचे अध्यक्ष अनिल भाऊ वर्मा आणि सदस्य नालमवार पाटील ह्यांनी पुढाकार घेतला.
विशेष सहकार्य राळेगाव पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक दिपकजी राणे,एससी रत्नपाल मोहाड़े, एनपीसी रुपेश जाधव, एलसीपी किरन मुरसाकर ह्यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री.महाकाल कावड़ यात्रा समितीचे मेघश्याम चांदे, सौ.संतोषीताई वर्मा,सौ.सरस्वतीताई सोनी,भुपत भाई कार्या ,रमेश सोनी,संदिप पेंदोर,जगदिश निकोडे,राहुल गांधी,ह्यांनी अथक परिश्रम घेउन कार्यक्रम पार पाड़ला.
