सेवामुक्त पोलीस संघटनेची कार्यकारीणी गठीत,अध्यक्षपदी अशोक भेंडाळे

पांढरकवडा तालुक्यातील सेवामुक्त पोलीस संघटनेच्या कार्यकारीणीस एक वर्ष पुर्ण झाल्याने नव्याने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सेवानिवृत्त एएसआय अशोक भेंडाळे यांची अध्यक्षपदी तर देवाजी कुमरे यांची उपाध्यक्ष, रमेश येडमे यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

तसेच कोषाध्यक्ष म्हणुन श्रीकृष्ण चरडे तथा महिला संघटक व सल्लागार म्हणुन सौ वनमालाताई कोवे (वानखडे) यांची निवड करण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी सर्व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, अधिकारी ध्वजारोहणा साठी पो स्टे मध्ये उपस्थित होते. त्यानंतर नव्या कार्यकारीणीची निवड करण्याकरीता त्यांची स्व गोपीनाथ मुंडे सभागृहात सभा घेण्यात आली. त्यामध्ये नक्षलग्रस्त भत्ता, आश्वासीत प्रगती योजना, वर्षातील जमाखर्च, आदिंवर चर्चा करुन नवी कार्यकारीणी गठीत करण्यात आली. सभेमध्ये तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.