वडकी पोलिसांनी कत्तलीसाठी नेत असलेल्या २३ नग जनावरांची केली सुटका, 34 लाख 60 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दि.१९/८/२४ रोजी पोलीस स्टेशन वडकी येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पो.स्टे.हद्दीतील देवधरी घाटात आयशर ट्रक क्र. एम एच. ४० सि.डी.१२०४ आणि आयशर ट्रक क्र. एम‌.एच. १८, बि.जी. ५१९७ दोन्ही वाहन ताब्यात घेऊन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यातून साठापुर, राज्य तेलंगाणा येथे २३ नर जातीच्या गोवंशाची कत्तलीकरिता वाहतूक करून नेत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन वडकी ४आरोपी विरुद्ध गुन्हा रजि. नं. ३९५/२०२४कलम ५,५(अ), ५(ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सह कलम ११(१) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
१) ४,६०,०००/- रु. की. चे २३ बैल
२) १५,००,०००-रु. की. चे आयशर क्र. एम.एच.४०
सि.डी. १२०४
३) १५,००,०००रु. की. चे आयशर क्र. एम.एच.१८.बि.जी.५१९७
एकूण ३४,६०,०००- रु. की. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामेश्वर वैजने यांचे मार्गदर्शनाखाली वडकी पोलिसांनी केली आहे.