
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झरगड येथील हनुमान वाघाडे यांचे गावा बाहेर झरगड ते लोणी रोड वर शेत असुन शेतात असलेल्या गोठ्यामध्ये दोन गोरे बांधुन होते या गोठ्यात असलेल्या एका बैलावर वाघाने हल्ला करून बैलाला ठार केल्याची घटना दिं २० ऑगस्ट २०२४ रोजी घडली असून वाघाड़े यांचे ५० हजाराचे नुकसान झाले आहे.
हनुमान वाघाडे हा नेहमी प्रमाणे सकाळी पहाटे शेतात गेले असता एका बैलाच्या मानीवर व पायावर पंजेमारून वाघाने ठार केल्याचे दिसून आले त्यानंतर वाघाड़े आजू बाजूला शोध घेतला असता त्यांच्या शेता जवळच नाला असुन नाल्यात वाघाचे मोठ मोठे पंजे दिसुन आले हा बैल अदांजे तीन ते चार वर्षाचा असुन ४० ते ५० हजार रूपये किमतीचा आहे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेने शिवारात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे दोन दिवसा अगोदर अंतरगाव शिवारात याच वाघाने गाईवर हल्ल्यात केला होता असे सांगण्यात येते घटना ठिकाणी रेंजर देवकाते व वनपाल कांबळे पशुवैधकीय अधिकारी डॅा रिकुं वासनीक पोलीस पाटील मनोज आत्राम यांनी घटनेची पाहणी केली.
